Nojoto: Largest Storytelling Platform

| कुण्या पाखरांने हवेला गवसले, निमिषातुनी सुर्य ते

| कुण्या पाखरांने हवेला गवसले, निमिषातुनी सुर्य तेजास दिपले...! |
|| किती ऋतू आणि किती कालचक्रे इथे साकळुनी बरसले हवेने ||

| कुण्या तारकामंडळातील वारा; तया पाखरांचा असा तो निवारा...! |
|| भीती रोखनी पाताळाच्या कृपेने, उडाला तो पक्षी अनंता कडे रे....! ||

| कुणी एक केतू अडवतो ती वाट; तिथे द्विज सांगे नवा तो वेदांत....! |
|| जीवांना जपावे मनाच्या कृपेने, हरी राऊळी ना जनांच्या रुपाने....! ||

|| जळे कर्मयज्ञ मांगे समिधांचे दान; नवा भारतीय तुझे कर्म आहे......!! ||

©Siddham Gawankar
  #महानिर्वाण