सदैव उंचावर फडकताना, डोळ्यांदेखत पहावा भारत, जगज्जेत्याच्या शर्यतीत कायम, टिकून रहावा भारत, जात, धर्म, पंथ आदितून, तारून निघावा भारत, फक्त माणुसकीचा हात हाती, धरून जगावा भारत, हृदयावर तीन रंगांनी जणू, कोरला जावा भारत, उगवण्यास आशेची पहाट, समृध्दीने पेरला जावा भारत, संवेदना जपून काहीसा, संवेदनशील व्हावा भारत, एकमेकांच्या साथीने आपण, पुढे पुढे न्यावा भारत, क्षितिजापलीकडे ही कायम, उजळताना दिसावा भारत, तुझ्या माझ्या अन् प्रत्येकाच्या, मनामनात असावा भारत... स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !! Happy Independence Day !! स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #India2021