Nojoto: Largest Storytelling Platform

थोडं वर्चुअल लाईव्ह.... गुगल प्ले स्टोर वरील ऍप्

थोडं वर्चुअल लाईव्ह....

गुगल प्ले स्टोर वरील 
ऍप्स प्रमाणे हवी तीच नाती 
इंस्टॉल करतात लोकं 
हवे त्याचेच अपडेट घेतात 
जरा जास्तच वापरतात डोकं 

नात्यांनाही चार्जिंग लागतं 
नाहीतर डिस्चार्ज होतात नाती 
जोडले गेलेत जगाशी 
अशी वर्चुअल यांची ख्याती 

निर्जीव होतोय संवाद आता 
कळत नाही देहबोली 
स्पर्श न कळला, दर्प न कळला 
फोटो मधील अबोली 

फेसबुक वरची व्याप्ती मोठी 
जगण्याची का संज्ञा छोटी 
सूर न जुळले भाव न कळले 
फोटोपूर्ती रंगरंगोटी 

                    - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे #थोडंवर्चुअल#
थोडं वर्चुअल लाईव्ह....

गुगल प्ले स्टोर वरील 
ऍप्स प्रमाणे हवी तीच नाती 
इंस्टॉल करतात लोकं 
हवे त्याचेच अपडेट घेतात 
जरा जास्तच वापरतात डोकं 

नात्यांनाही चार्जिंग लागतं 
नाहीतर डिस्चार्ज होतात नाती 
जोडले गेलेत जगाशी 
अशी वर्चुअल यांची ख्याती 

निर्जीव होतोय संवाद आता 
कळत नाही देहबोली 
स्पर्श न कळला, दर्प न कळला 
फोटो मधील अबोली 

फेसबुक वरची व्याप्ती मोठी 
जगण्याची का संज्ञा छोटी 
सूर न जुळले भाव न कळले 
फोटोपूर्ती रंगरंगोटी 

                    - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे #थोडंवर्चुअल#