Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्श मातीचा... ---------------------------- माझ्

स्पर्श मातीचा...
----------------------------
माझ्या हसोळ गावात
वाहे पाणी  झुळझुळ 
चव अवीट लागते
पाट बोले खळखळ

वनराई रुबाबात
दरी खोऱ्याच्या संगती
फुलवेली चहूकडे
तनमन हासवती

घर कौलारू बाबांचं
तेथे शोभे आजीबाई
घर सारवी जोशात
माझी मालकीण आई

शेणा मुताच्या वासाने
ओढ लागते गावाची
गोट्यामध्ये गाई म्हशी
साद घालती सुखाची

गंध कपाळी लावूनी
स्पर्श मातीचा करतो
माळरानं हिंडताना
थवा पक्षांचा पाहतो

चिऊताई, मैनाबाई
सूर  आनंदी लावती 
सांज अंगणी दिसता
घरा परतून जाती

चहूकडे हिरवळ
स्वर्ग सुखाचे कोकण
झाडवेली फुलवेली
करी आनंदित मन 

अभिमान वाटे मज
जन्म झाला कोकणात
ओढ मनात रुजली
गावं दिसता डोळ्यात

__________________
श्री.अविनाश लाड, राजापूर-हसोळ

©Avinash Lad
  स्वर्ग सुखाचे कोकण...
avinashlad2229

Avinash Lad

New Creator

स्वर्ग सुखाचे कोकण... #मराठीकविता

47 Views