Nojoto: Largest Storytelling Platform

#युगपुरूष मानवाच्या मानुसपणासाठी लढला तुम्ही क्


#युगपुरूष 

मानवाच्या मानुसपणासाठी
लढला तुम्ही क्रांतीच्या 
मशाली पेटवून..
त्या क्रांतीचे निखारे आजही
थाटात ऊभे आहेत
विचार नव्याने चेतवून..

लिहुन तुम्ही कायद्याची संहिता 
नांदवले इथले स्वातंत्र्य 
दिला पुनर्जन्म बुद्धाला 
थांबवून गुलामीच्या युध्दाला

कैक पिढ्या तुझ्याआधीच
उध्वस्त झाल्या हे काळालाही 
कळत नव्हतं
व्यवस्थेने बाटवलेल्या वस्तीकडे
मन ही कुणाच वळत नव्हतं 

'बा' भिमा तुझ्या झुंजार संघर्षाने 
स्थिरावलं आयुष्य सारे
गावकुसाबाहेरच्या वस्त्यात ही
फिरवलं तु पंचशिलाचे वारे 

नुकत्याच बदलल्यात ह्या
वस्त्याच्या भिंती अन् घर 
काळाच्या ओघात उमटतील त्यावर
तु सांगीतलेली अक्षर 
"आम्हाला या देशाची शासनकर्ती 
जमात व्हायचं आहे.."

मिलिंद मुरलीधर सरकटे 
9307240658

©milind sarkate
  #JAY_BHIM ,#namo_buddhay

#युगपुरूष 

मानवाच्या मानुसपणासाठी
लढला तुम्ही क्रांतीच्या 
मशाली पेटवून..
त्या क्रांतीचे निखारे आजही
थाटात ऊभे आहेत
विचार नव्याने चेतवून..

लिहुन तुम्ही कायद्याची संहिता 
नांदवले इथले स्वातंत्र्य 
दिला पुनर्जन्म बुद्धाला 
थांबवून गुलामीच्या युध्दाला

कैक पिढ्या तुझ्याआधीच
उध्वस्त झाल्या हे काळालाही 
कळत नव्हतं
व्यवस्थेने बाटवलेल्या वस्तीकडे
मन ही कुणाच वळत नव्हतं 

'बा' भिमा तुझ्या झुंजार संघर्षाने 
स्थिरावलं आयुष्य सारे
गावकुसाबाहेरच्या वस्त्यात ही
फिरवलं तु पंचशिलाचे वारे 

नुकत्याच बदलल्यात ह्या
वस्त्याच्या भिंती अन् घर 
काळाच्या ओघात उमटतील त्यावर
तु सांगीतलेली अक्षर 
"आम्हाला या देशाची शासनकर्ती 
जमात व्हायचं आहे.."

मिलिंद मुरलीधर सरकटे 
9307240658

©milind sarkate
  #JAY_BHIM ,#namo_buddhay