a-person-standing-on-a-beach-at-sunset माऊली माऊली गुरू दत्त माऊली भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... धृ... भक्तावर येता संकट क्षणांत होतात प्रकट संकटाचा नाश करून जीवन केले पावन गुरू माझी सावली भक्तीची वाट दावली... माऊली माऊली गुरू दत्त माऊली भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... १... कळे ज्याला दत्त नाम होई तो पुण्यवान भक्ती मार्गाचा होता भाग मोह मायेचा होतो त्याग भुतं पिच्चास करणी होमात जाळली गुरुरायाने आपल्या भक्तावर कृपा दावली... माऊली माऊली गुरू दत्त माऊली भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... २... गुरू विना जीवन व्यर्थ आज मज कळला अर्थ गुरू मायेचा हो आधार करती जिवनाचा उध्दार जीवनात दोष मुक्ती झाली अंधारात विजयला वाट दावली... माऊली माऊली गुरू दत्त माऊली भक्तांच्या हाकेला ओ धावली धावली... ३... ©Vijayo Mote गुरू माऊली...