Nojoto: Largest Storytelling Platform

लागली चाहूल वसंत ऋतूची वेळ झाली झाडा फुलांच्या बर

लागली चाहूल वसंत ऋतूची 
वेळ झाली झाडा फुलांच्या बरहण्याची 
नवीन पालवी फुटली झाडा-वेली 
जिकडे तिकडे हिरवळ पसरली 
वसंत -चैत्राच्या आगमनाने आला निसर्गास देखावा 
निसर्गात बहरला सुंदर रानमेवा 
शहरातल्यांना लागे हुरहुर गावी येण्याची 
गावाकडचा निसर्ग आणि प्रथा अनुभवण्याची 
सर्वांनाच आठवते घराकडची वाट 
पहाण्यास गावाकडची वसंत पहाट 
हीच वसंत पहाट, 
घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा 
आनंदाची गुढी उभारू आहे चैत्र पाडवा 
दुःख सारे विसरून जाऊ आणि या नवीन वर्षी 
नव्या नजरेने पुन्हा स्वप्न पाहू 
याच नव्या वर्षी पुर्ण होवोत सर्वांच्या ईच्छा आकांक्षा 
सर्वांना गुढीपाडवा आणि
 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🤗

©Roshana Parasharam Yallurkar 
  सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩

सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩 #Poetry

76 Views