Nojoto: Largest Storytelling Platform
roshanaparashara1859
  • 6Stories
  • 9Followers
  • 74Love
    609Views

Roshana Parasharam Yallurkar

  • Popular
  • Latest
  • Video
d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

प्रिय आईबाबा......❤😘
तुमच्यामुळेच आज मी या जगात आहे 
तुमच्यापासूनच माझा प्रत्येक दिवस आहे 
म्हणुन फक्त धन्यवाद बोलून 
नाही फेडू शकत तुमचे ऋण 
माझ्यासाठी मौल्यवान आहेत 
तुमचे चरण.....🙏
असाच आशिर्वाद राहो तुमचा माझ्यावरी 
हीच ईच्छा आहे माझ्या या जन्मदिनी 🤗

©Roshana Parasharam Yallurkar 
  जन्म दिवस  🤗

जन्म दिवस 🤗 #Quotes

90 Views

d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

जन्म होताच आपले जीवन होते सुरू 
याच जीवनाचा एकची चालक आहे गुरु 
आईवडीलां नंतरचे दैवत आपले गुरु 
ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु 

ज्ञानरुपी प्रकाश देण्यासाठी 
दिवा तो अखंड जळत राहतो 
आयुष्याचा खरा अर्थ आपणास 
गुरुंमुळेच तर कळतो 

आयुष्याचा कोरा कागद 
त्यावर सजते सुंदर नक्षी 
हे सिद्ध करण्यासाठी 
ही कविताच आहे साक्षी 

गुरुच आम्हास समजावतो 
आपल्या चुकांना सावरतो 
गुरुच आम्हास घडवून 
आकाशात झेप घेण्यास शिकवीतो 

गुरुवीणा शिष्य अपूर्ण आणि 
शिष्यावीणा गुरु अपूर्ण आहे 
म्हणूनच आज माझी जी पात्रता आहे 
त्यासही कारण माझा गुरु आहे 
🙏🌺

©Roshana Parasharam Yallurkar 
  गुरु 🙏🌺

गुरु 🙏🌺 #Quotes

106 Views

d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

जन्म होताच आपले जीवन होते सुरू 
याच जीवनाचा एकची चालक आहे गुरु 
आईवडीलां नंतरचे दैवत आपले गुरू 
ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु 

ज्ञानरुपी प्रकाश देण्यासाठी
दिवा तो अखंड जळत राहतो 
आयुष्याचा खरा अर्थ आपणास 
गुरुंमुळेच तर कळतो 

आयुष्याचा कोरा कागद 
त्यावर सजते सुंदर नक्षी 
हे सिद्ध करण्यासाठी 
ही कविताच आहे साक्षी 

गुरुच आम्हास समजावतो 
आपल्या चुकांना सावरतो 
गुरुच आम्हास घडवून 
आकाशात झेप घेण्यास शिकवीतो

गुरुवीणा शिष्य अपूर्ण आणि
शिष्यावीणा गुरु अपूर्ण आहे 
आज माझी जी पात्रता आहे 
त्यासही कारण माझा गुरु आहे

©Roshana Parasharam Yallurkar 
  गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺 #Quotes

66 Views

d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

लागली चाहूल वसंत ऋतूची 
वेळ झाली झाडा फुलांच्या बरहण्याची 
नवीन पालवी फुटली झाडा-वेली 
जिकडे तिकडे हिरवळ पसरली 
वसंत -चैत्राच्या आगमनाने आला निसर्गास देखावा 
निसर्गात बहरला सुंदर रानमेवा 
शहरातल्यांना लागे हुरहुर गावी येण्याची 
गावाकडचा निसर्ग आणि प्रथा अनुभवण्याची 
सर्वांनाच आठवते घराकडची वाट 
पहाण्यास गावाकडची वसंत पहाट 
हीच वसंत पहाट, 
घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा 
आनंदाची गुढी उभारू आहे चैत्र पाडवा 
दुःख सारे विसरून जाऊ आणि या नवीन वर्षी 
नव्या नजरेने पुन्हा स्वप्न पाहू 
याच नव्या वर्षी पुर्ण होवोत सर्वांच्या ईच्छा आकांक्षा 
सर्वांना गुढीपाडवा आणि
 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🤗

©Roshana Parasharam Yallurkar 
  सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩

सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🚩 #Poetry

76 Views

d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

मी.......एक अशी मुलगी आहे की, एकदा का नातं जोडलं तर ते मरेपर्यंत निभवायच मग ते कोणतही नात असुदे......आणि माझं एक चुकतं की मी लगेच सगळ्यांना जीव लावते आपले समजुन पण प्रत्येक जण आपले नसतात आणि कधीकधी आपलेपण परक्या सारखे वागतात आणि कधी परके पण आपले होऊन जातात.....म्हणुन तुम्हाला कस वागायचं आहे तसं वागा मी ठरवलय की आता विचार नाही करायचा जसं मला पाहीजेत तसंच जगायचं...🙂🤞

©Roshana Parasharam Yallurkar 
  #नातं ❤🙂
d60fcdac7675f4398f10608e8324636a

Roshana Parasharam Yallurkar

#शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा🚩🙏

#शिवजयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा🚩🙏 #Poetry

286 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile