Nojoto: Largest Storytelling Platform

चहा कोणाचातरी मी घालवित जातो ताण तर कोणाकरीता मी

चहा

कोणाचातरी मी घालवित जातो ताण
तर कोणाकरीता मी असे जीव की प्राण
नाही आवडत मी सर्वांस, पण राहतो मी नेहमी समान
घरी आलेल्या पाहुण्यांचा होतो सदा माझ्याहस्ते सन्मांन

सर्वांना आहे ओढ माझी, वाटे हे मला जग सारे प्रिय
कोणी मूडनुसार तर कोणी इच्छेनुसार पाही होते का माझी सोय?
सुरुवात करून देतो मी दिवसाची टवटवीने सक्रीय
प्रत्येक घराचा मी सदस्य होत झालो अमृतपेय राष्ट्रीय

विचारात अडकलेल्यांचे सोडवतो प्रश्न तरी बोलतात मला छपरी
ती सोडून गेल्यावर आठवण होते त्यांना गाठतातच माझी टपरी
काही म्हणा तुम्ही पण प्रत्येकाला मी नेहमी करतो बोलका 
साऱ्या गप्पागोष्टी निघतात समवेत, माझ्या मुळेच होतो घोळका

कधी कडक,कधी कटींग, कधी स्पेशल या उपमा माझ्या झाल्या
प्रेम वाटत मी जोडले "परिवार" ना कोणत्या चाचण्या दिल्या
धंदाच्या नावाखाली का उगाचच कधी येवले, कधी भोसले 
कधी प्रेमाचा तर कधी इराणीचा म्हणत माझ्या या वाटण्या केल्या

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #चहा #Tea #tealove #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #chai #marathi #kavita