Nojoto: Largest Storytelling Platform

ओरडते,रागावते,चिडते काही क्षणात पुन्हा प्रेमाने वा

ओरडते,रागावते,चिडते
काही क्षणात पुन्हा प्रेमाने वागते.
माझ्या माय वर माझे खूप प्रेम आहे,
माझी माय जणू दुधावरची साय आहे.
पाहिले नाही कधी भगवंतास ते कसे आहेत पण वाटे मनास,
पृथ्वीतलावरील देव म्हणजे माझी माय आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा:
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.