#विशालाक्षर #मिठी_म्हणजे मिठी म्हणजे हजारो शब्द आणि त्यात विरघळलेली मोहक कविता मिठी म्हणजे बांधून ठेवणं अलगद केस सोडल्यावर मोगऱ्याचं भान उरत राहणं मिठी म्हणजे काही क्षण थांबवणं काळ निरोप घेता घेता पुन्हा पुन्हा छातीशी घेणं मिठी म्हणजे गडद काळोख अस्तित्व सांडून एक होणं एकच उरणं... - विशाल पोतदार ©Vishal Potdar