Nojoto: Largest Storytelling Platform

हिरकणी कोजागिरीचा चंद्र आकाशी सजला होता उत्सव रायग

हिरकणी
कोजागिरीचा चंद्र आकाशी सजला होता
उत्सव रायगडावर त्यादिवशी रंगला होता

संध्याकाळ होता गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला
गवळण हिराला वेळेचा अंदाज नाही आला 

गड उतरण्या आता दुसरा कुठलाच मार्ग नव्हता 
त्या माऊलीचा काळजाचा तुकडा घरी पाळण्यात रडत होता

शीतल रूप चंद्राचे पाहून मन तिचे व्याकुळले 
त्यात प्रतिबिंब त्या आईला भुकेल्या बाळाचे दिसले 

काटेरी झाडे झुडपे, प्राणी ,पक्षी भयाण रात्र अन् किर्रर्र आवाज
दिसले ना काही तिला तिच्या ममतेपुढे आज

कासावीस जीव आईचा तान्हुल्या बाळाकडे धाव घेई
रायगडाचा कठीण कडही ती माऊली उतरून जाई 

लेकरसाठी आईने रचला एक नवा इतिहास
धाडसी माऊलीचा सत्कार करून हिरकणी नाव दिले बुरुजास 
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏🙏🙏🙏 हिरकणी #मराठीलेखणी #मराठीकविता