Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही साजरे करा हो 31st, कितीही दाखवाल हर्ष... म

कितीही साजरे करा हो 31st, 
कितीही दाखवाल हर्ष...
मराठमोळ्या माणसांचा उत्साह म्हणजे,
मराठी नूतन वर्ष...

नववर्षातील मासारांभ,
त्यातील प्रथम मास म्हणजे चैत्र...
त्याच्याच आगमनाकरीता उभारतो
मानाची गुढी ती पवित्र...

पाहाटे उठूनी, प्रातःस्नान  करुनी 
करितो नामस्मरण आणि उपासना...
यंदाचही वर्ष समर्थ कृपेने उत्तमाच जावं
हीच श्री सद्गुरू चरणी करितो प्रार्थना...

उंच आणि सरळ  ती वेळूची काठी
हळद कुंकू लावून करतात तिला वंदनीय...
वरी शालू अन् कलश ठेवून,
उभारतात मानाची गुढी ती पूजनीय...

 काही झाल तरी, जन्माने,कर्माने अन् वानिणे मराठी
शेवटी मराठी भाषेचा थाटाच भारी...💯
कितीही करा हौस-मौज, कितीही करा पार्टी पण,
आईने बनवलेली पुरणपोळी खाण्याची गंमतच न्यारी...

नववर्षातील,चैत्र मासातील, पहिलाच सण म्हणजे गुढीपाडवा...
चविष्ट अशा पुरणाच्या पोळीप्रमाणेच टिकून राहो आपल्या नात्यातील गोडवा...

साजरा करुया मराठमोळा सण, 
कसली करताय प्रतिक्षा...
माझ्या अन् माझ्या परिवाराकडून,
सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...💥

                                                                 -संचिता केकाणे

©Sanchita DILIP Kekane नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या