White आयुष्याला दिले आव्हान... संकटांनी कितीही छळले तरीही घट्ट पकडलेली मातीतील माझी पावले मागे हटणार नाही आयुष्यात येथील अनेक प्रसंग उरी सळसळलेली लढण्याची उमेद परत फिरणार नाही शरीरावरती पडू देत कितीही घाव जीवनाची नाव किनारीकाठी पोहोचवायची थांबणार नाही वाटेत आले आडवे काटे कुठे जरी जखमी पावलांना वाकून खाली बघणार नाही निवडलेला मार्ग असू देत कितीही वळणावळणाचा एकदा धरलेला प्रयत्नांचा रस्ता पुन्हा सोडणार नाही वादळं तुफान कसलेही समुद्री उसळू देत हाताश होवूनी कधी बसणार नाही वेदना होतील असंख्य मनावर अश्रू मुळीच गाळणार नाही या प्रसंगांनो या उभा मी इथे आहे कधीच तुम्हाला घाबरत नाही आव्हान हे माझे आयुष्याला धाडसाची तलवार जवळ बाळगीन रणांगणाची युद्धभूमी पार केल्याशिवाय मागे येणार नाही ©Mayuri Bhosale #आव्हान