तू वृत्तात अडकव म्हंटलीस कवितेला, मी भावनांची सांगड घालत बसलो... तू नव्यात रमलीस किती सहजतेने, मी जुनेच काहीसे चाळत बसलो... भेट ठरली होती किनाऱ्यावर, मी आठवणीत सांज ढाळत बसलो... तू स्वप्नांत ये म्हंटलीस त्या राती, मी झोपी जाण्याचे मग टाळत बसलो... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #sunrisesunset