आज पुसट बोथट झालेल्या शब्दांना धार लावावी म्हणते सगळेच घायाळ होतात शब्दांनी पण शिकार मीच होते सवालांनी जवाब काय द्यावे याचे असते कोडे अर्थ अनर्थाचे बांधलेले गाठोडे आता मीच शिकारी होईल म्हणते शब्दांना लावील धार ,आणि करील लेखणीने प्रहार ,ज्याने अज्ञान शब्दांची होईल हार,कोरा संकेतन होईल निळाशार हाच संकेतन सांगेल लेखणीची प्रतिभा त्यातच दिसेल संस्कारांची निर्मळ प्रतिमा हीच प्रतिमा एक सोनेरी चाहूल असेल, अपशब्दांकडून शब्दांच्या पलीकडे जाण्याचे संस्कारी पाऊल असेल पल्लवी फडणीस,भोर✍