ऋतू आला चैतन्याचा गंध दरवळे ओला साज शृंगारली धरा लपेटून गर्द शेला सर वेडी श्रावणाची क्षण येते क्षण जाते पाठशिवी ऊन छाया उलगढे गूढ नाते पानोपानी ती नवाळी हिरवाई माखलेली सप्तरंगी इंद्रचापी महिरपी रेखलेली श्रावणात सृष्टी न्हाली अंकुरले मातीपोटी बीज आशेचे कोवळे स्वप्नं रेखते ललाटी हर्ष उल्हास मनाला नवी मिळते उभारी मांगल्याचे, नाविन्याचे सजे तोरण हे दारी भूल पडली देहाला सारा सुखद सोहळा मनीं झूले आठवांचा मधू सूरम्य हिंदोळा ©Shankar kamble #श्रावण #श्रावणमास #पाऊस #श्रावण_सर #श्रावणधारा #श्रावणी_सोमवारी #श्रावणातील #पाऊसाततुझीआठवण