Nojoto: Largest Storytelling Platform

काव्यलेखन *विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे* *********

काव्यलेखन
*विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे*
********************
दाटले हे धुके प्रीतीचे
मन बावरे झाले,
चित्त नाही हे थाऱ्यावर
प्रेमाने चिंब ओले.

अंतरंगी पटलावर
खेळ प्रेमाचा चाले,
क्षणोक्षणी तुला पाहता
मन अस्थिर झाले.

काय जादू तुझ्या प्रेमाची
मजवरी तू केली,
उठता बसता वाटते
तू समोरच आली.

प्रेमाच्या दवात भिजलो
आधार घेत तुझा,
दाट धुक्यात हरवुनी
 कधी न होई माझा.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे
काव्यलेखन
*विषय:-दाटले हे धुके प्रीतीचे*
********************
दाटले हे धुके प्रीतीचे
मन बावरे झाले,
चित्त नाही हे थाऱ्यावर
प्रेमाने चिंब ओले.

अंतरंगी पटलावर
खेळ प्रेमाचा चाले,
क्षणोक्षणी तुला पाहता
मन अस्थिर झाले.

काय जादू तुझ्या प्रेमाची
मजवरी तू केली,
उठता बसता वाटते
तू समोरच आली.

प्रेमाच्या दवात भिजलो
आधार घेत तुझा,
दाट धुक्यात हरवुनी
 कधी न होई माझा.
------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke दाटले धुके हे प्रितीचे

दाटले धुके हे प्रितीचे #मराठीप्रेम