Nojoto: Largest Storytelling Platform

तो आभाळ विकायचं म्हणत होता मी चकित होऊन कोणतं म्हं

तो आभाळ विकायचं म्हणत होता
मी चकित होऊन कोणतं म्हंटलं?
तो त्याच्या डोक्यावरचं म्हणाला
मी त्याच्या डोक्याला न लागता
डोक्याला हात लावत, डोक्यावर 
पडलाय का?म्हणून विचारलं..
तो हसला आणि मला जगाची रीत
सांगू लागला..
जे आपलं कधीच नव्हतं;त्याचा नाही का
आपण व्यवहार करत.
मी जरा सविस्तरपणे सांग म्हंटलं...
तो वडिलोपार्जित संपत्तीचं उदाहरण देऊन
म्हणाला,ही कधीकाळी कोणीतरी विकली असेल
ती माझ्यापर्यंत येईपर्यंत अनेक भागात विभागली असेल.
तो नात्याचं उदाहरण देत म्हणाला
हे सुद्धा विकत मिळतं बरका..
लग्नात आर्थिक देवाणघेवाण होते 
आणि नातेसंबंध जुळले जातात.
आता डोक्याला हात लावायची वेळ माझी होती.
मी म्हंटलं सर्व ठीक आहे, परंतु हे डोई वरचं
आभाळ विकायचं खूळ काय भानगड आहे?
तो म्हणाला, इंच- इंच जमिनीच्या तुकड्यासाठी
झालेल्या लढाया इतिहासाने पाहिल्या आहे.
मी आता आभाळ विक्रीचा नवीन पायंडा
पाडणार आहे.
त्याच्या या अजब योजनेला मी शुभेच्छा दिल्या
आणि आभाळाकडे पाहत 
माझं आभाळ कीती भरेल? याचा
अंदाज घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.


 #तो आभाळ विकायचं म्हणत होता
तो आभाळ विकायचं म्हणत होता
मी चकित होऊन कोणतं म्हंटलं?
तो त्याच्या डोक्यावरचं म्हणाला
मी त्याच्या डोक्याला न लागता
डोक्याला हात लावत, डोक्यावर 
पडलाय का?म्हणून विचारलं..
तो हसला आणि मला जगाची रीत
सांगू लागला..
जे आपलं कधीच नव्हतं;त्याचा नाही का
आपण व्यवहार करत.
मी जरा सविस्तरपणे सांग म्हंटलं...
तो वडिलोपार्जित संपत्तीचं उदाहरण देऊन
म्हणाला,ही कधीकाळी कोणीतरी विकली असेल
ती माझ्यापर्यंत येईपर्यंत अनेक भागात विभागली असेल.
तो नात्याचं उदाहरण देत म्हणाला
हे सुद्धा विकत मिळतं बरका..
लग्नात आर्थिक देवाणघेवाण होते 
आणि नातेसंबंध जुळले जातात.
आता डोक्याला हात लावायची वेळ माझी होती.
मी म्हंटलं सर्व ठीक आहे, परंतु हे डोई वरचं
आभाळ विकायचं खूळ काय भानगड आहे?
तो म्हणाला, इंच- इंच जमिनीच्या तुकड्यासाठी
झालेल्या लढाया इतिहासाने पाहिल्या आहे.
मी आता आभाळ विक्रीचा नवीन पायंडा
पाडणार आहे.
त्याच्या या अजब योजनेला मी शुभेच्छा दिल्या
आणि आभाळाकडे पाहत 
माझं आभाळ कीती भरेल? याचा
अंदाज घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो.


 #तो आभाळ विकायचं म्हणत होता