विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ || चंदनाचा ऐसा पितपिंताबर चंदनाचे कर , कटावर ||१|| चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी घननिळरंगी , रंगोनिया...||२|| चंदनाचे बन ऐसा तो सुगंध.. येई मंद मंद , परिमळ..||३|| म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन.. झिजविण्या तन , तुम्हालागी..||४|| गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी. रचना :-संतश्रेष्ठी कैकाडीबुवा ©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.