Nojoto: Largest Storytelling Platform

मी जीवनगाणे गातो आहे.. खंत ना मजला आता जराही मी ज

मी जीवनगाणे गातो आहे..

खंत ना मजला आता जराही
मी जीवनगाणे गातो आहे
वसंत असो नसो सोबतीला
मी कलेकलेने बहरतो आहे
माझाच सहवास मला लाभता
मी माझ्यातचं रमतो आहे
नको वल्गना थातूरमातूर
मी मलाचं माझ्यात शमवतो आहे
घालू नका साद आता कोणी
मी स्वतःतचं स्वतःला शोधतो आहे
कितीक राहून गेलेल्या क्षणांना
क्षणभर थांबून मोजतो आहे
कोण माझा मी कोणाचा
प्रश्न ना मला छळतो आहे
क्षणभंगूर हे जगणे इथले
क्षणही मला क्षणात कळतो आहे
नको लत्करे विचारु आयुष्या
तूला कधी का मी टाळतो आहे?
वरपांगी नाही रे माझे मिलन
तुझ्यास्तव अख्खं काळीज जाळतो आहे
म्हणो कोणी काहीही मला
मी माझे सुख दुःखालाच म्हणतो आहे
देणे व्हावे माझ्या करवी
माणूसपण एवढेचं मी जाणतो आहे.....

मी माझी.....
09/03/2023

©Sangeeta Kalbhor
  #holihai खंत ना मजला आता जराही
मी जीवनगाणे गातो आहे
वसंत असो नसो सोबतीला
मी कलेकलेने बहरतो आहे
माझाच सहवास मला लाभता
मी माझ्यातचं रमतो आहे
नको वल्गना थातूरमातूर
मी मलाचं माझ्यात शमवतो आहे

#holihai खंत ना मजला आता जराही मी जीवनगाणे गातो आहे वसंत असो नसो सोबतीला मी कलेकलेने बहरतो आहे माझाच सहवास मला लाभता मी माझ्यातचं रमतो आहे नको वल्गना थातूरमातूर मी मलाचं माझ्यात शमवतो आहे #शायरी

349 Views