Nojoto: Largest Storytelling Platform

#शिवबाचा अवतार 🚩 आई जिजाऊ पोटी जन्मुनी, केला रयत

#शिवबाचा अवतार 🚩

आई जिजाऊ पोटी जन्मुनी,
केला रयत उद्धार!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!

तोरनावरी शपथ घेऊनी,
माय बहिणींची लाज राखली !
दिनदुबळ्याना हाथ देऊनी,
मराठीयांची साथ राखली!
दुष्ट दुर्जना पात कराया उचलली तलवार !
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!


बादशाहीची दौड रोखूनी,
स्वराज्याचे तख्त बसवूनी !
गणीमांचा अन्याय मोडूनी,
न्यायचा झेंडा रोवूनी !
अभिमानाने दवडू लागली मराठी ललकार !
शिवबाचा अवतार!
जाहला शिवबाचा अवतार !!

पाणी जिंकले सागरा तले,
शिळा जिंकले गडकोटातले !
तारे जिंकले आकाशातले,
मने जिंकुनी जन्मनातले!
फडकू लागली भगवी पताका महाराष्ट्रावरी स्वार!!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!
जय जिजाऊ! जय शिवराय!!

©Vishnu Bongane Patil जय जिजाऊ! जय शिवराय 🚩🚩!!!
#marathaempire
#marathahistory
#शिवबाचा अवतार 🚩

आई जिजाऊ पोटी जन्मुनी,
केला रयत उद्धार!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!

तोरनावरी शपथ घेऊनी,
माय बहिणींची लाज राखली !
दिनदुबळ्याना हाथ देऊनी,
मराठीयांची साथ राखली!
दुष्ट दुर्जना पात कराया उचलली तलवार !
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!


बादशाहीची दौड रोखूनी,
स्वराज्याचे तख्त बसवूनी !
गणीमांचा अन्याय मोडूनी,
न्यायचा झेंडा रोवूनी !
अभिमानाने दवडू लागली मराठी ललकार !
शिवबाचा अवतार!
जाहला शिवबाचा अवतार !!

पाणी जिंकले सागरा तले,
शिळा जिंकले गडकोटातले !
तारे जिंकले आकाशातले,
मने जिंकुनी जन्मनातले!
फडकू लागली भगवी पताका महाराष्ट्रावरी स्वार!!
शिवबाचा अवतार,
जाहला शिवबाचा अवतार !!
जय जिजाऊ! जय शिवराय!!

©Vishnu Bongane Patil जय जिजाऊ! जय शिवराय 🚩🚩!!!
#marathaempire
#marathahistory

जय जिजाऊ! जय शिवराय 🚩🚩!!! #marathaempire #marathahistory #शिवबाचा