Nojoto: Largest Storytelling Platform

काटेरी कुंपण -Dharmendra V Gopatwar काटेरी कुं

काटेरी कुंपण
 -Dharmendra V Gopatwar 

 काटेरी कुंपण या मातीच्या घराला 
  
दाराला हर एक कुलूप  .., 
  माणसांच्या संघटन असलेल्या या नगराला ..
   जंगली होत चालल्या विचारांना ,
   काटेरी कुंपण..,
  जंग बसलेल्या विचारांना 
 
काटेरी कुंपण _
   सुंदर फुल बहरलेल्या रोपटीच्या वेलांना 
         
  काजळ कुमारीच्या गालाला 
काटेरी कुंपण चोरांच्या त्या नजरेला
प्रश्नचिन्ह माणुसकीच्या  अस्तित्वाला
पायी तुळविल्या जाणाऱ्या भावनांना 
नजर झुकते  ..,  
दभंगलेल्या सुप्त राक्षसी भावनांना
         
 काटेरी कुंपण त्या आसुरी वृत्तीला
काटेरी कुंपण .., 
बामण वेशात दारी येणाऱ्या रावणाला ..

जातच कलंक त्या जन्मतः मिळणाऱ्या जातीला
 वंदन त्या वीरमरण पत्करलेल्या वडराला
नमन: कर्माने क्षत्रिय त्या कर्तुत्वाला .
       
जन्माने आकर्षण वेद पुराणांचा..
        सात्विक आहाराचा स्वाद त्याच्या जिभेला 
          शतकोटी प्रणाम भूतदया शिकविणाऱ्या त्या चमारपुत्राला ..,
            
 सुगंध चिखल गर्भातून बाहेर पडणाऱ्या पुष्पा ला
 वंदन जातीला वळण आणणाऱ्या त्या भूमिपुत्राला ..
शोध प्रेम करुणा शिकवण देणाऱ्या शांती प्रस्थापित करणाऱ्या पूज्य आचार्याची  
   
ओढ शब्दांची गरज नसलेल्या  भाषेची .
 आतुरता नव्याने विचारांना
   स्नान करविनाऱ्या युगपुरुषाची..

गरज प्रत्येक मनी दैव असलेल्या मनुष्याची
प्रेममय संदेश देणाऱ्या युगप्रवर्त विचाराची .
आतुरता..
  कुंपणाची गरज नसलेल्या  युगाची ..

©Dharmendra Gopatwar #काटेरी कुंपण
काटेरी कुंपण
 -Dharmendra V Gopatwar 

 काटेरी कुंपण या मातीच्या घराला 
  
दाराला हर एक कुलूप  .., 
  माणसांच्या संघटन असलेल्या या नगराला ..
   जंगली होत चालल्या विचारांना ,
   काटेरी कुंपण..,
  जंग बसलेल्या विचारांना 
 
काटेरी कुंपण _
   सुंदर फुल बहरलेल्या रोपटीच्या वेलांना 
         
  काजळ कुमारीच्या गालाला 
काटेरी कुंपण चोरांच्या त्या नजरेला
प्रश्नचिन्ह माणुसकीच्या  अस्तित्वाला
पायी तुळविल्या जाणाऱ्या भावनांना 
नजर झुकते  ..,  
दभंगलेल्या सुप्त राक्षसी भावनांना
         
 काटेरी कुंपण त्या आसुरी वृत्तीला
काटेरी कुंपण .., 
बामण वेशात दारी येणाऱ्या रावणाला ..

जातच कलंक त्या जन्मतः मिळणाऱ्या जातीला
 वंदन त्या वीरमरण पत्करलेल्या वडराला
नमन: कर्माने क्षत्रिय त्या कर्तुत्वाला .
       
जन्माने आकर्षण वेद पुराणांचा..
        सात्विक आहाराचा स्वाद त्याच्या जिभेला 
          शतकोटी प्रणाम भूतदया शिकविणाऱ्या त्या चमारपुत्राला ..,
            
 सुगंध चिखल गर्भातून बाहेर पडणाऱ्या पुष्पा ला
 वंदन जातीला वळण आणणाऱ्या त्या भूमिपुत्राला ..
शोध प्रेम करुणा शिकवण देणाऱ्या शांती प्रस्थापित करणाऱ्या पूज्य आचार्याची  
   
ओढ शब्दांची गरज नसलेल्या  भाषेची .
 आतुरता नव्याने विचारांना
   स्नान करविनाऱ्या युगपुरुषाची..

गरज प्रत्येक मनी दैव असलेल्या मनुष्याची
प्रेममय संदेश देणाऱ्या युगप्रवर्त विचाराची .
आतुरता..
  कुंपणाची गरज नसलेल्या  युगाची ..

©Dharmendra Gopatwar #काटेरी कुंपण