*"मानवता हिच खरी जात..."* जातपातिच्या या जंजाळात, माणुसकी कुठं हरवली? मनामनांत भिंती उभ्या, ही दुनिया कुठं भरकटली? ना रक्त वेगळं, ना श्वास वेगळा, ना दुखं कुणाची कमी-जास्त, पण तरीही भेद उराशी घेऊन, का लावतो आपण धर्म, जात? एकच सूर्य तापतो इथे, एकच चंद्र शीतलता देतो, एक माणुस दुसऱ्या माणसाला, का वेगळ्या ढाच्यात मांडतो? कोण आपला, कोण परका, हे ठरवायला इथे कोण आले? मानवता हाच खरा धर्म आपला, हे जग कधी समजून घेईल का भले? हात जोडून एकच तुम्हां मागतो, खरा माणूस म्हणून मोठं व्हा, जात-पात, धर्म विसरून सारे, माणुसकीचं एक बीज बना! "धर्म अनेक, विचार अनेक, पण माणुसकी एकच असावी, जात नको, पात नको, फक्त प्रेम आणि शांतता वाढावी!" ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #SushantSinghRajput #kaavyankur #mayurlawate #Poetry #Love #Life