Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं माझं भांडण, इतक्यात असं मिटतंय का ? आपण एका श

तुझं माझं भांडण, इतक्यात असं मिटतंय का ?
आपण एका शहरात नाही, हे तुला पटतंय का ?

असं निराळ्या शहरात राहणाऱ्यांनी भांडू नये,
उगाच एकमेकांचा जीव वेशीला टांगू नये...

प्रश्नांचा भडिमार तुझा, धड एक उत्तर देता येत नाही,
इतका हतबल मी, तुला साधं मिठीत घेता येत नाही...

मी जोवर पास नाही, तोवर मला दूर ही नको करू,
बोलून टाक खदखद मनातली, अबोला हा नको धरू...

एक दोन दिवस ठीक, तिसऱ्या दिवशी मन रमतंय का ?
तुझं माझं भांडण लांबवणं, तुला नक्की जमतंय का ?

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar #CityWinter