Nojoto: Largest Storytelling Platform

*कोंडला श्वास भारतमातेचा* कोंडला श्वास भारत मातेचा

*कोंडला श्वास भारतमातेचा*
कोंडला श्वास भारत मातेचा
तिच्याच लेकरांमुळे
विविधेतेत एकता सांगणाऱ्यांभोवती
असलेल्या जातीच्या क्षुद्र कुंपणामुळे...
आहे अनेक राजहंस येथे
जातीच्या डबक्यात पोहणारे
धर्मनिरपेक्ष आईच्या पोटी जन्म घेऊन
तिच्याच मानव्याची विटंबना करणारे...
नको विवाह इथे व्हायलाजातीधर्माच्या डबक्यातले
मानवतेच्या नदीत सारे भारतीय म्हणून एकरूप होऊन वहा रे...
आईजवळ असतो सर्वच लेकरांना ठाव
चला आपण सर्व तीच्या कुशीत निजुया रे
करुनि शांत भेदाची भुते
एकतेच्या मशाली हाती घेऊन नाचूया रे
रागवूया,रुसूया एकमेकांवरती
पण प्रेमाचे पीक ही पिकवूया रे
विसरून जाती धर्माच्या भिंती
एकरूप होऊन जाऊया रे
नको बांधुया जातीधर्माचीक्षुद्र घरकुले स्वतःभोवती 
फुलवून फुले व्यापक दृष्टीकोनाची
फुलवूया भारतीय संस्कृती
सरमिसळ होऊन धर्माची एकच
मानव धर्माचे नवचैत्यन्य देशात निर्माण होऊद्या रे
कोंडला श्वास भारतमातेचा
जरा मोकळा होऊद्या रे
©️®️:-शब्दवर्षा❣️
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर
अहमदनगर #poettes
*कोंडला श्वास भारतमातेचा*
कोंडला श्वास भारत मातेचा
तिच्याच लेकरांमुळे
विविधेतेत एकता सांगणाऱ्यांभोवती
असलेल्या जातीच्या क्षुद्र कुंपणामुळे...
आहे अनेक राजहंस येथे
जातीच्या डबक्यात पोहणारे
धर्मनिरपेक्ष आईच्या पोटी जन्म घेऊन
तिच्याच मानव्याची विटंबना करणारे...
नको विवाह इथे व्हायलाजातीधर्माच्या डबक्यातले
मानवतेच्या नदीत सारे भारतीय म्हणून एकरूप होऊन वहा रे...
आईजवळ असतो सर्वच लेकरांना ठाव
चला आपण सर्व तीच्या कुशीत निजुया रे
करुनि शांत भेदाची भुते
एकतेच्या मशाली हाती घेऊन नाचूया रे
रागवूया,रुसूया एकमेकांवरती
पण प्रेमाचे पीक ही पिकवूया रे
विसरून जाती धर्माच्या भिंती
एकरूप होऊन जाऊया रे
नको बांधुया जातीधर्माचीक्षुद्र घरकुले स्वतःभोवती 
फुलवून फुले व्यापक दृष्टीकोनाची
फुलवूया भारतीय संस्कृती
सरमिसळ होऊन धर्माची एकच
मानव धर्माचे नवचैत्यन्य देशात निर्माण होऊद्या रे
कोंडला श्वास भारतमातेचा
जरा मोकळा होऊद्या रे
©️®️:-शब्दवर्षा❣️
वर्षा प्रकाश वायकर
संगमनेर
अहमदनगर #poettes