नित्याचा कलहाचा गराडा चुकवून तो उंबरा सोडून एकांत कवटाळून बसला तोच एक निष्पाप चिमुरडा त्याला एकांत साधनेतून जागे करीत होळी पेटली म्हणून ओरडून सांगू लागला. तसा तो चिमुरडयाकडे खोट्या स्मितहास्याचा आव आणीत मनाशीच पुटपुटला. होळी पेटली म्हणून काय नवल? मन विश्वात सामंजस्य नावाचा ऋतू उजाडला म्हणजे ती नकारात्मकता आणि अतिविचाराच्या समिधेसह धग देण्यास आपसूकच सज्ज होते. ती शांत कधी होणार ते सांग. #भावनांची होळी *शुभ. पडघान* ©शुभ पडघान