Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1479206038
  • 18Stories
  • 58Followers
  • 1.5KLove
    592Views

शुभ पडघान

  • Popular
  • Latest
  • Video
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

New Year 2024-25 वर्ष सरलं म्हणून दुःख नसतेचं पण सरत्या वर्षाच्या जोडीला घटका घटकात वय गिळणारा ब्रम्हराक्षस दबा धरून असतो जो जन्म आणि मृत्यूमधील अंतर कापून अनंताच्या प्रवासाला जाण्यास मनुष्यास उदयुक्त करत असतो खरी मेख तिथेच असते...!!

#सरते वर्ष...!!

©शुभ पडघान #NewYear2024-25
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

देश माझा जगाचा अन्नदाता 
ही बाब ठरली आज खरी आहे...!!

अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत 
बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!!

#शेतकरी दिन...!!

©शुभ पडघान #leafbook
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

शिवरायांच्या शौर्याची गाज...!!
संतांच्या साहित्याचा साज...!!
सुधारकांच्या कार्याचा रिवाज...!!
शास्त्रीय संगीताचा आवाज...!!

असणारी माय मराठीच्या मुकुटावर अभिजाततेचा मुकुट बसविल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे मनस्वी आभार...!!
🙏🏻🎊🎉💐🚩🙏🏻

©शुभ पडघान #GoodNight
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान #raindrops
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!!

#मतदान दिन...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान #VoteForIndia
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

White काल परवा पासून सुरु असलेल्या नेते मंडळींच्या फोन मुळे एक बाब मात्र अधोरेखित होते ती म्हणजे 

लोकशाहीच्या बाजारातील मतदार हा असा माल आहे की ज्याची किंमत केवळ फक्त निवडणुकांवेळीचं वाढते...!! अन्य वेळी ज्याची जागा केवळ मोडकळीस आलेले घर अथवा पडीक जागाचं असते...!!

#लोकशाहीचा उत्सव...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान #VoteForIndia
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

आगीपेक्षा ज्वालाग्राही जिद्द म्हणावी लागेल कारण 
एकवेळ आगीने पेटलेला माणूस विझेल पण जिद्दीने पेटलेला कधीही नाही...!!

©शुभ पडघान #BoneFire
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

आपल्या पाल्याचे आणि शाळेचे भवितव्य टिकविण्याची महत्वकांक्षा असेल तर उद्या दि ९ ऑक्टोबर रोज सोमवार ला होऊ घातलेल्या बंदच्या आवाहनाला उस्फूर्त साथ द्या...!!

#Save the Solanki sir...!!
#Save the School...!!
🚫👨🏻‍🏫🏫

©शुभ पडघान #Dhund
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

महिन्याभराच्या उघडीपी नंतर मध्यरात्री सुरू झालेल्या पाऊसाने जयेशच्या संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली...!!
अत्यानंदित होवून जयेशच्या आईने दरवाजा उघडला जणू ती पंचारती घेवून पाऊसाच्या औक्षणासाठी सज्ज झाली होती...!! कुटुंबातील सर्व सदस्य मिळेल त्या जागेतून कोसणाऱ्या पाऊस धारा चकित नजरेने डोळ्यात सामावुन घेत होते पिकांसोबत डोळ्यांची तृष्णा पाऊस मनसोक्त भागवीत होता...!! वृद्धापकाळाने अंथरुणाला खिळलेला वृध्द म्हाताराही आजार बाजूला सारून खाटेवर उठून बसला होता...!! घरातला लहानगा चिंटू टाळ्या वाजवून "पाऊस आला पाऊस आला" म्हणून घर डोक्यावर घेवू लागला...!!
त्याला मध्येच खोडत पाऊस नाही पिकात आणि शेतकऱ्याच्या जीवात जीव आला असं म्हण म्हणून म्हातारा गालावर खळी आणून हसला...!!

ऐकूनच पाऊस आता आला होता साचलेल्या ढगात समृध्दी तर वाहणाऱ्या पाण्यातून दैन्य वाहतांना सगळ्यांना दिसत होते...!!

©शुभ पडघान #janmashtami
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

शेतीत राम नाही म्हणून घरच्यांशी भांडून सदाने तालुक्याला मोठं कापडाच दुकान थाटलं; पण दोन वर्षात रग्गड कमाई करून शेतीला हिन समजणारा सदा गेल्या 8 दिवसांपासून मार्केटात कमालीचा  शुकशुकाट अनुभवत होता...!!
अधिक महिना असूनही कापड विक्री मंदावली होती...!! 
दुकानच्या आराम खुर्चीत बसून विचार करूनही उत्तर मिळत नसतांनाच अचानक त्याचा फोन वाजला 15 दिवसांपासून पाऊस नाही शेतीमाल सुकून चाललाय असं बापाच्या तोंडच वाक्य ऐकलं आणि तत्क्षणी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं...!!
सुकणारा शेतीमाल मार्केटातील गर्दी सुध्दा सुकवितो आहे याची जाणीव झाली...!!
आपण शेतीला सोडलं पण शेतीने आपल्याला सोडलं नाही ह्याच विचाराने तो चटकदार उन्हाकडे निर्विकार बघू लागला...!!

©शुभ पडघान #Sukha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile