मृत्यू मृत्यू कोणा टळला नाही... पत्ता त्याचा कळला नाही! जीवन आहे अग्निपरीक्षा... सुटला ना जो छळला नाही! जात्यामध्ये पडता दाणा... राहील कसा दळला नाही? जिंकत जातो जग वेडा तो... ध्येयाने जो चळला नाही! 'धत तेरे की' त्याची दुःखा... ज्याचा आसू गळला नाही! जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #Faceexpression