White *⚔️ शिवजयंती — स्वराज्याचा सोहळा ⚔️* फाल्गुन वद्य तृतीयेला उगवला एक तेजाचा दिवा, शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याचं स्वप्न जागं झालं देवा... जिजाऊंच्या पदरातलं सोनं, या सह्याद्रीचा अभिमान, जन्मला सिंहपुरुष घेऊन, हिंदवी स्वराज्याचा प्रण महान... पालखीत नाही, ना गुलाब, कमळात नाही, तर या मातीच्या सुगंधात जन्मला तो सिंह शाही... त्याच्या पहिल्या रडण्यात रणसंग्रामाचा नाद होता, त्याच्या पहिल्या पावलात स्वराज्याचा निनाद होता... बालपणापासून तलवारीशी सख्य केलं ज्याने, अन्यायाशी दोन हात करण्याचं बाळकडू प्यालं त्याने... जिजाऊंच्या मंत्रात बळ, स्वयं भवानीचं त्याला वरदान होतं, स्वराज्य घडवणाऱ्या मावळ्यांसाठी राजे जीव की प्राण होतं... दुर्गदुर्गेश्वराला वाट पाहत होती ती अनमोल घडी, सह्याद्रीच्या कड्यांत सिंहगर्जना ऐकायची होती खडी... आणि त्या गर्जनेनं मुघलांचं काळीज थर थर कापलं होतं, मराठी मनात स्वातंत्र्याचं वादळ उफाळून उठलं होतं... शिवजयंती म्हणजे फक्त एक जन्मदिन नाही, तो पराक्रमाचा सोहळा, आहे मराठी मनाचा शाही... छत्रपती शिवाजी महाराज नावानं रक्त जणू सळसळतं, “जय भवानी, जय शिवाजी!” आवाजात अखंड आभाळ हे गडगडतं... शिवजयंती म्हणजे स्वराज्याचा आहे उज्ज्वल प्रकाश, जो काळाच्या कप्प्यातही कधीच होणार नाही नाश! ©मयुर लवटे #life_quotes #ShivajiMaharajJayanti #marathi #Poetry #Life