Nojoto: Largest Storytelling Platform

कोसळले होते आभाळ माझ्यावर त्याला आजपर्यंत हिमतीने

कोसळले होते आभाळ माझ्यावर 
त्याला आजपर्यंत हिमतीने पेलले . .
एकटी होती मी , चार चौघात असताना 
प्रत्येकाने मला त्याच्या दृष्टीने पाहिले . .

झळ सोसली मी , प्रत्येक क्षणाची 
आगीत प्रत्येकवेळी पेटत राहिले . .
अभद्र शब्द ऐकत होते कालपर्यंत 
आता मात्र आयुष्य लेकरासाठी वाहिले . .

कळकळ मनाची सोसून जन्मभर 
एकांतात मन , नेहमी गहिवरले . .
भाळी असलेलं कुंकू जेव्हा पुसले 
तेव्हा जगण्याचे कारण हिरावले . .

घराचा एक कोपरा आश्रयस्थान मानले मी
हसणे ही आता माझ्यासाठी समाजाने गुन्हा ठरवले . . 
माझे बोलणे समाजाच्या दृष्टीने अशुभ असे 
वाटते जणू , तिरस्कृत होण्यासाठी मी जिवंत राहिले . .

आता मात्र श्वास आहे श्वासात 
पण मनात असलेले प्रश्न नाही सुटले . .
मनात असलेल्या इच्छा आकांक्षांचे 
आजपर्यंत काही पारणे नाही फिटले . .

©Mohit Jain #Chand_tuta_tara_pighla
कोसळले होते आभाळ माझ्यावर 
त्याला आजपर्यंत हिमतीने पेलले . .
एकटी होती मी , चार चौघात असताना 
प्रत्येकाने मला त्याच्या दृष्टीने पाहिले . .

झळ सोसली मी , प्रत्येक क्षणाची 
आगीत प्रत्येकवेळी पेटत राहिले . .
अभद्र शब्द ऐकत होते कालपर्यंत 
आता मात्र आयुष्य लेकरासाठी वाहिले . .

कळकळ मनाची सोसून जन्मभर 
एकांतात मन , नेहमी गहिवरले . .
भाळी असलेलं कुंकू जेव्हा पुसले 
तेव्हा जगण्याचे कारण हिरावले . .

घराचा एक कोपरा आश्रयस्थान मानले मी
हसणे ही आता माझ्यासाठी समाजाने गुन्हा ठरवले . . 
माझे बोलणे समाजाच्या दृष्टीने अशुभ असे 
वाटते जणू , तिरस्कृत होण्यासाठी मी जिवंत राहिले . .

आता मात्र श्वास आहे श्वासात 
पण मनात असलेले प्रश्न नाही सुटले . .
मनात असलेल्या इच्छा आकांक्षांचे 
आजपर्यंत काही पारणे नाही फिटले . .

©Mohit Jain #Chand_tuta_tara_pighla
mohitkurkut1489

Mohit Jain

New Creator