तो बाप तू विसरलास का ? लहानाचा मोठा केला , अंगा खांद्यावरती खेळविला. अरे स्वत भोक पडलेली , कापड वापरली. पण तुज्या शर्ट ला कधी, मळ नाही लागू दिला. कधी कोणत्या गोष्टीला , नाही मनाला का? तो बाप तू विसरलास का ? तुज्या साठी रातदिन राबून, पैसा पुरवतो तुला. तो पैसा पार्टीत उडवतानी, तो घामाने भरलेला त्याचा चेहरा, तो घट्टे पडलेला हाथ , कधी निरखून पाहिलास का? तो बाप तू विसरलास का ? हा आता झालास तू मोठा, चिकार पैसा कमवून , मोठं मोठ्या गाड्याने फिरतोस. पण लहान पनी ज्या बापाच्या खांद्याला, स्वारी बनवून दिवस दिवस फिरायचास, तो खांदा तू विसरलास का? तो बाप तू विसरलास का ? #NojotoQuote