Nojoto: Largest Storytelling Platform

जादूची परी स्वप्नांतल्या दर्पणात मला मी स्वप्नसु

जादूची परी

स्वप्नांतल्या दर्पणात 
मला मी स्वप्नसुंदरी भासते 
क्षणभर का होईना 
जादू करणारी परी असते 

मग काय पंख लावूनी 
आकाशात घेते मी भरारी 
दुःखी दिसेल जो कोणी  
तिकडे निघते माझी स्वारी 

जादूची काठी फिरवून 
लोकांचे दुःख सारते दूर 
मग त्यांच्या जीवनात 
येतो आनंदाचा महापूर 

स्वप्नांतल्या दर्पणाची 
गंमतच काही निराळी 
हसू आले गालावरी 
झोपेतून उठताना सकाळी 

मग मी उठून, स्वतःला 
आरशात जेव्हा पाहिलं 
स्वप्नांच्या दर्पणातील स्वप्न 
माझ्या डोळ्यांतच राहिलं 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #dreamgirl 
#स्वप्नसुंदरी 
#जादूचीपरी
#JKpoetess 
#jyotikiratkudve
जादूची परी

स्वप्नांतल्या दर्पणात 
मला मी स्वप्नसुंदरी भासते 
क्षणभर का होईना 
जादू करणारी परी असते 

मग काय पंख लावूनी 
आकाशात घेते मी भरारी 
दुःखी दिसेल जो कोणी  
तिकडे निघते माझी स्वारी 

जादूची काठी फिरवून 
लोकांचे दुःख सारते दूर 
मग त्यांच्या जीवनात 
येतो आनंदाचा महापूर 

स्वप्नांतल्या दर्पणाची 
गंमतच काही निराळी 
हसू आले गालावरी 
झोपेतून उठताना सकाळी 

मग मी उठून, स्वतःला 
आरशात जेव्हा पाहिलं 
स्वप्नांच्या दर्पणातील स्वप्न 
माझ्या डोळ्यांतच राहिलं 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #dreamgirl 
#स्वप्नसुंदरी 
#जादूचीपरी
#JKpoetess 
#jyotikiratkudve