Nojoto: Largest Storytelling Platform

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मना

वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे*
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे*