Nojoto: Largest Storytelling Platform

वेड मी जे करतोय ते प्रेम नाही,त्याला एक वेड म्हणत

वेड
 मी जे करतोय ते प्रेम नाही,त्याला एक वेड म्हणतात..

भारतमातेच्या रक्षणासाठी 
डोळ्यात तेल घालून
काळ्याकुट्ट अंधारात
एकटा जागून जो देशाला झोपवतो
त्याला वेड म्हणतात....

निधड्या छातीने समोरून
येणारी गोळी छातीवर झेलून
देशाचं रक्षणासाठी 
जीवाचा त्याग करतो
त्याला वेड म्हणतात...

ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात 
जिथे दोन पाऊलं चालू शकत नाही
तिथे अनेक मैल चालून 
आपले कर्तव्य पणाला लावतो
त्याला वेड म्हणतात..

रक्त गोठणाऱ्या बर्फामध्ये
अन ऑक्सिजन नसलेल्या वातावरणामध्ये
आपलं कर्तव्य इमानदारीने
सदैव अन निरंतर पार पाडतो
त्याला वेड म्हणतात.....

अनेक हजार फुट बर्फात चढताना
जेव्हा स्वतःचा श्वास ही दम तोडतो
अश्या प्रसंगी काळजातल्या ठोक्यानंही 
बजावून सांगतो,की अजून मी जिवंत आहे
त्याला वेड म्हणतात...

मरण माझं निश्चित आहे
हे माहीत असूनसुद्धा
आपल्या निधड्या छातीने 
दुष्मणावर आग बनून बरसतो
अन आपल्या प्राणाची बाजी लावतो
त्याला वेड म्हणतात...

अखंड प्रेम करणाऱ्या नात्याना
फोनवरुनच सावरत असतो
मी नक्की येईन,नक्की भेटेन
असे खोटे वादे करून,देशासाठी समर्पित होतो
त्याला वेड म्हणतात..

अन देशाच्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा
त्याग करत हे अनमोल जीवनाचं प्रेम
हे कोणत्या मुलीवर नाही
तर भारतमातेच्या रक्षणासाठी करतो
त्याला वेड म्हणतात...

©विलास वाकसे वेड
वेड
 मी जे करतोय ते प्रेम नाही,त्याला एक वेड म्हणतात..

भारतमातेच्या रक्षणासाठी 
डोळ्यात तेल घालून
काळ्याकुट्ट अंधारात
एकटा जागून जो देशाला झोपवतो
त्याला वेड म्हणतात....

निधड्या छातीने समोरून
येणारी गोळी छातीवर झेलून
देशाचं रक्षणासाठी 
जीवाचा त्याग करतो
त्याला वेड म्हणतात...

ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात 
जिथे दोन पाऊलं चालू शकत नाही
तिथे अनेक मैल चालून 
आपले कर्तव्य पणाला लावतो
त्याला वेड म्हणतात..

रक्त गोठणाऱ्या बर्फामध्ये
अन ऑक्सिजन नसलेल्या वातावरणामध्ये
आपलं कर्तव्य इमानदारीने
सदैव अन निरंतर पार पाडतो
त्याला वेड म्हणतात.....

अनेक हजार फुट बर्फात चढताना
जेव्हा स्वतःचा श्वास ही दम तोडतो
अश्या प्रसंगी काळजातल्या ठोक्यानंही 
बजावून सांगतो,की अजून मी जिवंत आहे
त्याला वेड म्हणतात...

मरण माझं निश्चित आहे
हे माहीत असूनसुद्धा
आपल्या निधड्या छातीने 
दुष्मणावर आग बनून बरसतो
अन आपल्या प्राणाची बाजी लावतो
त्याला वेड म्हणतात...

अखंड प्रेम करणाऱ्या नात्याना
फोनवरुनच सावरत असतो
मी नक्की येईन,नक्की भेटेन
असे खोटे वादे करून,देशासाठी समर्पित होतो
त्याला वेड म्हणतात..

अन देशाच्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा
त्याग करत हे अनमोल जीवनाचं प्रेम
हे कोणत्या मुलीवर नाही
तर भारतमातेच्या रक्षणासाठी करतो
त्याला वेड म्हणतात...

©विलास वाकसे वेड