#विशालाक्षर #Fathers_Day बाभळीसारखा रखरखीत माणूस कसा लेकराजवळ फुलपाखरू होतो मख्ख दगडासारखा चेहरा कसा पिटुकल्यापुढे नटसम्राट होतो वेळच नसणाऱ्या माणसाचे तासन्तास छोट्यासाठी खुले होतात कफल्लक जरी झालाच तर होतं नव्हतं ते त्या जीवाच्या नावे होऊन जातं.. बापपण स्वयंभू असतं.. हाताचा झोका पायाची गाडी श्वासांचं गाणं मनाचा गर्भ हृदयाचा पान्हा होतो आणि बाळासोबत.. एक बाप क्षणात जन्म घेतो... - विशाल पोतदार ©Vishal Potdar