Nojoto: Largest Storytelling Platform

*मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा* महान अश्या

*मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा* 

महान अश्या या राष्ट्राचे आम्ही गाउया हो गुणगान,
भारत देशात गाजते आपल्या महाराष्ट्राची शान. 

इतिहासाची कमान आणि आमच्या शिवबांचे पोवाडे,
वेडात मराठे दौडले सात स्वराज्याचे ते वेडे. 

उत्तुंग पर्वत रांगा अन लाभला सागरी किनारा,
मुंबई शहराचा आमच्या अनोखा असे नजारा. 

टिळक, फुले,आगरकर असे जन्मले आपले लाल,
भोगले त्यांनी स्वातंत्र्यासाठी कित्येक हो हाल. 

अजरामर ही मराठी भाषा दिली आम्हा या राष्ट्राने, 
संत परंपरा वारकरी संप्रदाय जपला हो या भुमीने.

प्रत्येक क्षेत्रात चमकते तारे घडले या मातीत,
युगपुरुष अन विरमातांचे संस्कार भिनले आमुच्या रक्तात. 

संविधान लिहीले बाबासाहेबांनी तर सन्मान दिला बाळासाहेबांनी, 
अनेक संकटे आली तरीही सामना केला आमच्या त्या शुर वीरांनी. 

गर्व असे आम्हा आमच्या राष्ट्राचा पुर्ण जगात गाजावाजा,
चला अभिमानाने सांगू आपण
मी महाराष्ट्राचा अन महाराष्ट्र माझा.

 *कवी - स्वरुप सावंत* 
 *9082194858* महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन