Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी वाट तुच सजव कशी का असेना काट्यांची असो वा फु

तुझी वाट तुच सजव
कशी का असेना काट्यांची असो
 वा फुलांची त्यात तुझाच वाटा 
जास्तीचा असेल 
सुखांत तुझ्या असतील लाख
 पण तुझ्या वेळेला पडणारे खुप कमी...
नको झगडुस ज्याच्यासाठी तुला स्वतःला
 विसरावं लागलं
झाडाला पालवी सावलीची
विश्वासाला पाझर विश्वासाची 
अंधारात साथ चंद्राची 
प्रेमाला आयुष्यभर सोबत भेटण्याची 
ही जन्मभर पुरणारी ठेव कधी कुणाला 
 वेळेवर भेटली का......... 
खंत कधी पुर्ण होते का 
क्षण क्षण जपताना 
किती कोलमाडा होतो मनाचा 
ज्याचं त्यालाच माहिती 
तुझी सोबत तुझी आवड तुझा छंद 
तुझं हसु तुच जप कारण तुला तुच ओळखती
परिपुर्ण...
अपेक्षेच ओझं इतरांच्या वहीतुन फाडुन
तुझ्या विश्वासात कोर मग बघ 
कश्या पुर्ण होत नाहीत । आखिर तुच तुझी सोबती,

©SUREKHA THORAT #मनाचेबोल 
#leaf
तुझी वाट तुच सजव
कशी का असेना काट्यांची असो
 वा फुलांची त्यात तुझाच वाटा 
जास्तीचा असेल 
सुखांत तुझ्या असतील लाख
 पण तुझ्या वेळेला पडणारे खुप कमी...
नको झगडुस ज्याच्यासाठी तुला स्वतःला
 विसरावं लागलं
झाडाला पालवी सावलीची
विश्वासाला पाझर विश्वासाची 
अंधारात साथ चंद्राची 
प्रेमाला आयुष्यभर सोबत भेटण्याची 
ही जन्मभर पुरणारी ठेव कधी कुणाला 
 वेळेवर भेटली का......... 
खंत कधी पुर्ण होते का 
क्षण क्षण जपताना 
किती कोलमाडा होतो मनाचा 
ज्याचं त्यालाच माहिती 
तुझी सोबत तुझी आवड तुझा छंद 
तुझं हसु तुच जप कारण तुला तुच ओळखती
परिपुर्ण...
अपेक्षेच ओझं इतरांच्या वहीतुन फाडुन
तुझ्या विश्वासात कोर मग बघ 
कश्या पुर्ण होत नाहीत । आखिर तुच तुझी सोबती,

©SUREKHA THORAT #मनाचेबोल 
#leaf