Nojoto: Largest Storytelling Platform

मी मराठी... माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्या

मी मराठी...
माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे..
माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे....

माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार..
वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार...

सार्‍या दर्‍या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने..
कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने...

माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती..
पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती...

माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने..
भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने...

माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती..
माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती...

Vishal/Aadinaath 
28-06-21

.

.

©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra