Find the Best marathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove shayari in marathi, marathi poem on athavan love, best whatsapp love status in marathi, love shayari marathi, shayari love marathi,
काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
*अचानक तिची भेट…* बस स्थानकावर गर्दीत उभा होतो, अनाहूतपणे तिचं नाव घेत होतो… क्षणभर वाटलं, हसतोय वेड्यासारखा, आणि अचानक ती समोर दिसली स्वप्नासारखी… नजरेला नजर भिडली, काळ थबकला, गर्दीचा कोलाहलही शांतसा वाटला… हसली हलकसं, जणू संध्याकाळचा गारवा, त्या हसण्यात अजूनही होतं ते जुनं आपलंसं बावरेपण… "कशी आहेस?" मी विचारलं नकळत, ती म्हणाली, "छान! तूही बदलला नाहीस बरं?" दोघंही गप्प झालो क्षणभर, पण चेहऱ्यावर समाधान होतं, त्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी मनही भरून आलं होतं… विचारणा घेत बसलो, हळुवार गप्पा रंगल्या, वेळ उलटत होता, तरी आठवणी भूतकाळातच अडकल्या… भूतकाळ आठवला तरी, वर्तमान हसू लागलं, भेट काही मिनिटांची, पण आठवणींनी दोघांनाही फुलवलं… ती निघाली, मीही निघालो, पण मन मात्र मागेच होतं, गर्दीत हरवूनही, आत कुठेतरी गारवा शोधत होतं… दोघांनीही मागे वळून पाहिलं एकवार, आणि समजलं, काही बंध कधीच नसतात विस्मृतीपार... ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Moon #kaavyankur #mayurlawate #Love #Life #Poetry #marathi
#Moon #kaavyankur #mayurlawate Love Life #Poetry #marathi
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *📞 तिचा फोन आला… 📞* पुष्कळ वर्षांनी तिचा आज अचानक फोन आला, आवाज तसाच, पण सूर थोडा बदललेला। कधी काळी जी सोबतीची स्वप्नं होती रंगवली, तीच स्वप्नं आज विरघळल्याची तक्रार होती मांडली॥ दबक्या आवाजात ती म्हणाली— "सगळं बदललंय रे, जीवनाच्या वाटा वेगळ्या वळल्या। पण कधी कधी वाटतं, आपण सोबत असतो तर किती बरं झालं असतं!" मी ऐकत राहिलो, शांत, न बोलता, तिच्या प्रत्येक शब्दात भूतकाळ होता गुंतला। कधी मी तिचं भविष्य होणार होतो, आणि आज, मी फक्त एक आठवण झालो होतो ॥ ती म्हणाली— "कदाचित सुखी झाले असते, तुझ्या सावलीत आयुष्य हे रंगले असते। हा सगळा नशिबाचा खेळ असतो म्हणे, पण काही स्वप्नं नशिबावर भारी असतात म्हणे... मी हसलो हलकसं, काही न बोलता, कारण उत्तर होतं, पण शब्द नव्हते। मनातल्या मनात म्हटलं, "हो, पण नियतीच्या खेळात हरलेलो आपण दोघंच होतो!" ती बोलत राहिली, आठवणी जागवत, मी ऐकत राहिलो, हसत-हसत। शेवटी फोन कट झाला, आणि आठवणी पुन्हा मनात दाटल्या॥ 📞 तिचा फोन आला, दोघांचं बोलणं झालं, पण नशिबाच्या या खेळात, पुन्हा एक रिकामेपण राहलं… ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Sad_Status #Love #Life #Nojoto #Poetry #kaavyankur #marathi
#Sad_Status Love Life #Poetry #kaavyankur #marathi
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *⚔️ कवी कलश आणि संभाजी राजे: शब्दांचा संवाद ⚔️* *छत्रपती संभाजी राजे:* कवी कलशा, सांग, या रणसंग्रामात तुझ्या शब्दांची तलवार किती धारदार? मी देह अर्पील, या काळ्या मातीसाठी, तू शब्द देशील का, या हिंदवी स्वराज्यासाठी? *कवी कलश:* राजे, तुमच्या शौर्यावर लेखणी मी वाहीन, तुमच्या त्यागाचा इतिहास सदैव मी गाईन। तुमच्या तलवारीची चमक कवितेला माझ्या देईन, मराठ्यांच्या तेजाचा जागर सदैव घडवीत राहीन॥ *छत्रपती संभाजी राजे:* कलशा, तलवार उगारली मी अन्यायाविरुद्ध, आणि तू लेखणीने केलं बंडखोर युद्ध। शब्दांसाठी खरंच तु जिवंत राहशील का? मराठ्यांच्या गाथा अशाच पुढे नेशील का? *कवी कलश:* राजे, तुमच्या रक्ताचा रंग ओळींना मी देईन, शब्दांतून हे हिंदवी स्वराज्य रेखाटत मी राहीन। तुमच्या बलिदानाला माझ्या शब्दांचे दान आहे, तुमच्या स्वप्नांना माझा शतशः प्रणाम आहे॥ *छत्रपती संभाजी राजे:* कलशा, माझ्या डोळ्यांत मृत्यू तुला दिसणार नाही, ही तलवार हिंदवी मातीसाठी कधी झुकणार नाही। मी जाईन, पण तू नेहमी कविता बनून राहशील, तुझ्या लेखणीने शिवराय आपला जपशील॥ *कवी कलश:* राजे, तुम्ही अमर, तुमच्या कथा ही अमर, तुमच्या रक्ताने उगवेल एक नवा स्फूर्तीवर। तुमच्या पराक्रमाने पृथ्वी ही सदैव गाजत राहील, शंभू राजे, इतिहास तुमच्या नावाने सदैव लिहिला जाईल॥ ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #Sad_Status #marathi #Poetry #sambhajimaharaj #chhava
#Sad_Status #marathi #Poetry #sambhajimaharaj #chhava
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White "तिचं ब्लॉक करणंही प्रेमाचा एक भाग असतो..." ती अचानक नाहीशी झाली, ना कुठलाही मेसेज, ना तिची शेवटची भेट, मी शोधत राहिलो तिला Online, ती मात्र गायब झाली नेटवर्क सकट थेट... तिच्या DP वरचा तो फोटो ही बदलला, Status आता मला तिचा दिसतही नाही, कधीतरी "Seen" तरी कर ना msg? पण ती मात्र चुकून काहीच वाचतही नाही... कुणाला ब्लॉक करणं म्हणजे काय? तर त्याच्यासाठी प्रेम संपलं असं नसतं, ते कधी कधी स्वतःला वाचवण्याचं, तर कधी आठवणी जपण्याचं कारण असतं... ती ब्लॉक करेल, हे मला कधी वाटत नव्हतं, पण माझं मन तिला कधी Block करू शकत नाही, तिनं वाट बंद केली, पण रस्ता बदलता येत नाही, ती नाही म्हणाली, तरी तिच्यावरचं प्रेम विसरता येत नाही... Typing… आता कधी तिची मला दिसणार नाही, तिच्या नावाची नोटिफिकेशन कधी मला येणार नाही, व्हिडीओ कॉल तिला करता मला येणार नाही, तिचा हसरा गोड चेहरा पुन्हा बघता मला येणार नाही... पण अजूनही माझ्या मनाच्या इनबॉक्समध्ये तीच पहिला आणि शेवटचा मेसेज आहे... आजही तिला सांगायचंय –"तू ब्लॉक केलं असलंस, तरीही माझं प्रेम अजूनही तुझ्याच साठी Online आहे..." "तुझ्याच साठी Online आहे..." ©काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे #alone_sad_shayri #Love #Poetry #Life #GoodNight #marathi
#alone_sad_shayri Love #Poetry Life #GoodNight #marathi
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨ अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास, गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास, तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते, गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते… देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे, अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे, मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे, विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे... बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात, माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात, चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो, सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो… सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो, संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो, रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा, मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा… पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते, स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते, या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे, कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे… अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे, प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे, ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे, अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे... ©मयुर लवटे #citylife #amravatikar #Life #Love #Poetry #maharashtra #marathi
#citylife #amravatikar Life Love #Poetry #maharashtra #marathi
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
White *⚔️ शिवजयंती — स्वराज्याचा सोहळा ⚔️* फाल्गुन वद्य तृतीयेला उगवला एक तेजाचा दिवा, शिवनेरीच्या मातीतून स्वराज्याचं स्वप्न जागं झालं देवा... जिजाऊंच्या पदरातलं सोनं, या सह्याद्रीचा अभिमान, जन्मला सिंहपुरुष घेऊन, हिंदवी स्वराज्याचा प्रण महान... पालखीत नाही, ना गुलाब, कमळात नाही, तर या मातीच्या सुगंधात जन्मला तो सिंह शाही... त्याच्या पहिल्या रडण्यात रणसंग्रामाचा नाद होता, त्याच्या पहिल्या पावलात स्वराज्याचा निनाद होता... बालपणापासून तलवारीशी सख्य केलं ज्याने, अन्यायाशी दोन हात करण्याचं बाळकडू प्यालं त्याने... जिजाऊंच्या मंत्रात बळ, स्वयं भवानीचं त्याला वरदान होतं, स्वराज्य घडवणाऱ्या मावळ्यांसाठी राजे जीव की प्राण होतं... दुर्गदुर्गेश्वराला वाट पाहत होती ती अनमोल घडी, सह्याद्रीच्या कड्यांत सिंहगर्जना ऐकायची होती खडी... आणि त्या गर्जनेनं मुघलांचं काळीज थर थर कापलं होतं, मराठी मनात स्वातंत्र्याचं वादळ उफाळून उठलं होतं... शिवजयंती म्हणजे फक्त एक जन्मदिन नाही, तो पराक्रमाचा सोहळा, आहे मराठी मनाचा शाही... छत्रपती शिवाजी महाराज नावानं रक्त जणू सळसळतं, “जय भवानी, जय शिवाजी!” आवाजात अखंड आभाळ हे गडगडतं... शिवजयंती म्हणजे स्वराज्याचा आहे उज्ज्वल प्रकाश, जो काळाच्या कप्प्यातही कधीच होणार नाही नाश! ©मयुर लवटे #life_quotes #ShivajiMaharajJayanti #marathi #Poetry #Life
#life_quotes #ShivajiMaharajJayanti #marathi #Poetry Life
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️* सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली, स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली... जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल, तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल... मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला, रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला... दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी, त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी... वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा, बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा... मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते, असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते... शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून, मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून... तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल, त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल... त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा, गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा... ⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे, स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️ ©मयुर लवटे #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry #Life
#ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry Life
read moreTofik
White वोह एक खुशी के लिये हर एक चीझ कर जाऊ अपनी मां के लिये इस पुरी दुनिया से लड जाऊ...!❤️🩹🌍🧕 ©Tofik #Thinking #maa #Mom #mummy #marathi life quotes in marathi life shayari in hindi life quotes in tamil life quotes in hindi reality life quotes in hindi
उ.सु
White मन जिथे रमते तिथे तिथे मरते, मरताना पाहुनी त्याला शब्दाचे अमृत पाजावेसे वाटते.. मग कळते मन किति किति झुरते, मन जिथे रमते तिथे तिथे मरते ©उ.सु #Sad_Status #marathi #MarathiKavita
#Sad_Status #marathi #MarathiKavita
read moreAnagha Ukaskar
Unsplash नुकतेच पंख फुटलेल्या माझ्या छोट्याश्या चिमण्यांनो, थोड्याच दिवसात अशा भुर्रकन उडून जाल रिकाम्या खोल्यांत आणि इथल्या गोंधळातही अनेकदा मला तुम्ही वावरताना दिसाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लहान मोठ्या गोष्टीखातर मारलेली हाक, बाहेर जाऊन आलो तरीही खाऊ नाही आणला म्हणून उगाचंच रागाने फुगलेलं नाक गप्पा मारत केलेलं मॉलिश आणि स्किनकेअर तेव्हाच आपण टिपलेले ते विचित्र असे फोटो गाण्यांच्या मैफिली आणि उशांची मारामारी आता जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा आनंद होतो भल्या पहाटे आपोआप बंद झालेला पंखा आणि अंगावर ओढलेलं ऊबदार असं ब्लँकेट बऱ्याचदा सहजंच म्हणून दिलेलं लाल गुलाब आणि वाढदिवसाला दिलेली ती सुंदर अशी भेट कळत नकळत केलेल्या या प्रेमाच्या गोष्टी अनोळखी जागेला असं घर बनवून राहिलात मायेने सामावून घेऊन आणि होऊन कळलेच नाही केव्हा इतक्या जवळच्या झालात म्हणूनच सोबत देत आहे शुभेच्छा तुम्हाला आकाशाकडे उंच उंच भरारी घ्याल कवेत येतील स्वप्ने सारी आजवर पाहिलेली एक दिवस नक्की ती पूर्णत्वाला न्याल आणि तुम्हालाही आठवावेत हे दिवस केव्हातरी भविष्यात जेव्हा केव्हा मागे वळून पहाल वेळ काढून पुन्हा जमाल, न जमाल पण नक्कीच या दिवसांच्या आठवणीत रमाल... पण नक्कीच... या दिवसांच्या आठवणीत रमाल ©Anagha Ukaskar #farewell #Book #kavita #marathi #hostel #Nojoto #poem