Nojoto: Largest Storytelling Platform

तू नसता माझी मी नसते... पहिला दुर्मिळ रोमांचित क

तू नसता माझी मी नसते... 

पहिला दुर्मिळ रोमांचित क्षण, आठवताना स्वप्नी येतो
किती हवा तू मला सख्या रे, डोळे मिटताना तू दिसतो

चांदवा नभी प्रीतफुला की, कोणती तुला उपमा द्यावी
तूच सुवासिक मोहक अत्तर  , दरवळताना उरात भिनतो

आवडतो आपण ज्याला रे, कायम त्याचे व्हावे आपण
मनी मानसी भास अभासी, जाणवताना खरेच असतो

जमले नाही मला कधी हे , तुझ्याविना मन रमवू कोठे
भेटीसाठी दोघे आतुर, काहुरताना व्याकुळ होतो

काय बोचते काळजास ह्या,  उदासीनता का येते ही
अडकत गेले तुझ्यात हे मन, सोडवताना गुंता होतो

इतकी तुझ्यात हरवत गेले, मलाच मी सापडते कोठे
तू नसता माझी मी नसते, तू असताना दोघे असतो

🍁 अलका 🍁