Nojoto: Largest Storytelling Platform
alkakulkarni9975
  • 7Stories
  • 13Followers
  • 18Love
    0Views

Alka Kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

*दरवळून आले*      ..... 

वाटे कितीक बोलू पण ओठ बांधले मी, उमगे परस्परांना जे साकळून आले
ती भेट आठवावी दोन्ही मनामनांची, काही क्षणात अपुले नाते जुळून आले

बांधून घेतले मी आवर्त सोबतीला, चकव्यात अडकावा माझाच जीव का रे? 
तू काळजात आहे श्वासात तूच आता, हे प्राणप्रिय होणे मजला कळून आले

गुंजारवात त्याच्या जावे भिनून इतके, भ्रमरास पाहते अन् उमले जशी कलिका
श्वासासवे फुलावी ही लहर सौरभाची, मी ही तशीच प्रिया बघ दरवळून आले

आभास हे विखारी छळती किती नव्याने, नाहीस तू तरीही आहे इथे तिथे तू
विरहातले उमाळे शमवू कसे अताशा, हे भेटणे उखाणे आज उजळून आले

उकलू नकोस गाठी प्राणात गुंतलेल्या, अंधार सोबतीला आहे तसा असू दे
एकेक या दिसांचे गळताच पान हळवे, बेमोसमी सरींनी मी हिरवळून आले

🍁 *अलका* 🍁

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

मन माझे.. 

पाखरांच्या पंखावर...ओली थरथर...
तशी माझिया मनाला...सदा हुरहुर ।।

सोडूया तळ्यात नवी...कागदाची होडी... 
ओल्या अंगणात मारू...ढगातून उडी...
इंद्रधनू वर बांधू...झुला रंगदार...।।

मखमली काळ्या निळ्या...ठिबक्यांच्या राशी..
मन फुलपाखराची...नक्षी नाजुकशी...
कळ्या फुलांना कळते...गुज अलवार... ।।

पान्हा फुटावा ढगाला...मन व्हावे चिंब...
अळवाच्या पानावर...मोतीयाचा थेंब...
पिंजलेल्या कापसाचे...आभाळात घर...।।

कधी व्हावेसे वाटते...खळाळता झरा...
नदी दऱ्याखोऱ्यातून...पांढुरक्या धारा...
रानोमाळ भटकावे...डोंगराच्या पार...।। 

मन माझे कधी होई...वारे वेडेपिसे...
धावताना दूर दूर...थके ना जरासे...
कधी काही ना दुखते...त्याचे कणभर... ।।

कसे कुठे मन माझे...बसे अडकून...
शब्दाच्या जाळ्यात जसे...नवे कोरे पान...
आपसूक रचली मी.. कविता सुंदर...।।

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

विश्वास... 

काळाची धारदार करवत हसत होती
घटनांचे दात अणकुचीदार झाले होते
अचानक एक आधार निखळला
आकाशानं पाळत ठेवूनही
काचेचा सूर्य निखळला

डोळ्यात रेतीचे बारीक कण उडाले
दृष्टी जखमी झाली
काहीच दिसत नाहीय
बहुधा... 
जग अजून आस्तित्वात आहे!

(भरोसा/अमृता प्रितम) 


अनुवाद

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

विश्वास... 

काळाची धारदार करवत हसत होती
घटनांचे दात अणकुचीदार झाले होते
अचानक एक आधार निखळला
आकाशानं पाळत ठेवूनही
काचेचा सूर्य निखळला

डोळ्यात रेतीचे बारीक कण उडाले
दृष्टी जखमी झाली
काहीच दिसत नाहीय
बहुधा, जग अजून आस्तित्वात आहे.. 

(भरोसा/अमृता प्रितम) 
अनुवाद  🍁 अलका 🍁

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

विश्वास... काळाची धारदार करवत हसत होती घटनांचे दात अणकुचीदार झाले होते अचानक एक आधार निखळला आकाशानं पाळत ठेवूनही काचेचा सूर्य निखळला

विश्वास... काळाची धारदार करवत हसत होती घटनांचे दात अणकुचीदार झाले होते अचानक एक आधार निखळला आकाशानं पाळत ठेवूनही काचेचा सूर्य निखळला

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

तू नसता माझी मी नसते... 

पहिला दुर्मिळ रोमांचित क्षण, आठवताना स्वप्नी येतो
किती हवा तू मला सख्या रे, डोळे मिटताना तू दिसतो

चांदवा नभी प्रीतफुला की, कोणती तुला उपमा द्यावी
तूच सुवासिक मोहक अत्तर  , दरवळताना उरात भिनतो

आवडतो आपण ज्याला रे, कायम त्याचे व्हावे आपण
मनी मानसी भास अभासी, जाणवताना खरेच असतो

जमले नाही मला कधी हे , तुझ्याविना मन रमवू कोठे
भेटीसाठी दोघे आतुर, काहुरताना व्याकुळ होतो

काय बोचते काळजास ह्या,  उदासीनता का येते ही
अडकत गेले तुझ्यात हे मन, सोडवताना गुंता होतो

इतकी तुझ्यात हरवत गेले, मलाच मी सापडते कोठे
तू नसता माझी मी नसते, तू असताना दोघे असतो

🍁 अलका 🍁

f69e432b9b4e2984f5c595f2e364dc0a

Alka Kulkarni

आवडतो पाऊस.. 

चिंब चिंब मज करतो पाऊस
गरजत बरसत येतो पाऊस
हवाहवासा सुखावणारा
धो धो रिमझिम पडतो पाऊस

कोकिळ राघू मैना गाती
मोर रानपाखरे नाचती
जांभुळले आभाळ ओणवे
व्याकुळतो रूणझुणतो पाऊस

कधी झिरपतो कधी टपकतो
हसरा गोजिरवाणा होतो
अंगाला झोंबता गारवा
बघ नुसता गडगडतो पाऊस

भुरभुर झरझर धुवाधार 
रिपरिप खळखळ मुसळधार
नकोच छत्री रेनकोट हा
भिजायला बोलवतो पाऊस 

अपुल्या मर्जीने तो येतो
त्रेधा तिरपिट कधी उडवतो
तळे बनवतो कधी साचुनी
तुला मला आवडतो पाऊस


🍁 अलका 🍁


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile