Nojoto: Largest Storytelling Platform

मना मनात रुजावी नव चैतन्याची गुढी.. प्रित पालवी फु

मना मनात रुजावी नव चैतन्याची गुढी..
प्रित पालवी फुटावी, जावी निखळून अढी..!!

पाने पंचक आंब्याची साक्ष देती मांगल्याची..
नजरेत सजवावी प्रेम मुर्ती वात्सल्याची..!!

माळ साखरी गोडवा जिभेवर रेंगाळावा..
कडूनिंब सेवनाने तमोगुण दूर व्हावा..!!

वस्त्र रेशमी पताका उंच उंच लहरावी..
सद्भावनेची महती सर्व दूर पसरावी..!! 

नवबहर झेंडूचा मनी केसर रुजावा
रांगोळीच्या नवरंगी नित्य खुलून दिसावा..!! 

चैत्र पालवी कोवळी सोन झळाळी किरणी..
देतो शुभेच्छा मनस्वी पाडव्याच्या शुभदिनी..!! गुढीपाडवा

गुढीपाडवा