Nojoto: Largest Storytelling Platform

#गळा मिठी कसा सांगू बा विठ्ठला मी कशी घातली तुझीय

#गळा मिठी 
कसा सांगू बा विठ्ठला मी कशी घातली तुझीया गळा मिठी 
पण काही क्षणी तुझ्या मंदिरी मी येऊ न शकलो तू फार दूर राहशी 
दृढ श्रद्धेने घरी आणले असे कल्पिले तुला मजपाशी
तेव्हाही माझ्या हृदयराऊळी साक्षात असा तू उभा राहिला
भोळा भक्तिभाव ता मनीचा मी तुझ्या चरणावरी ओतला
काय सांगू कुणास मी कशी ही मनात मावेना मनात भरली खुशी
तु मज असा अनाहुतपणे भेटता मजसमोर
उभा तटस्थ राहिलो कसा मी तुज काहीच न मागता 
विसरून गेलो भवदुःखा ते मी भोगत असता 
जादूगिरी ही तुझी मज कळेना क्षणात त्या एका 
फळ भक्तीचे मिळते तेव्हा भक्ताचे लाड पुरवण्या राजी तू जेव्हा होशी
मंदिरी तुझ्या सदानकदा भक्तांचा गराडा नसे तुला क्षणभरही उसंत
कित्येक भाविक धार्मिक येती महात्मे संत नी महंत 
त्यातही असतात व असतील ढोंगी कुणी तुजला वाटे ना कसली खंत 
श्रद्धेचा हा बाजार मांडला तो तुला न येई पसंत 
खऱ्या भक्तीला ओळखून तू सदा राही उभा भक्तांच्या पाठीशी
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #विठ्ठला_तुझी_अगाध_माया