Nojoto: Largest Storytelling Platform

White वेळ वेळेवरच रोज येते , वेळेला उशीर झाला

White वेळ  वेळेवरच  रोज  येते ,
वेळेला उशीर  झाला नाही
 
ऋतूचक्रांनी खेळ जो मांडला 
पावसातही पाणी उरले नाही 

भिजले सारे स्वप्न माझे, 
कोरडे सत्य पटले नाही

 शब्द रुसून गेले केव्हाच,
तो वाद आता राहिला नाही

मी माझा म्हणतच राहिले 
तो माझा कधी झाला नाही

जे उरले ते जिंकले मी ,
दोष कुणाला दिला नाही 

सौ. सुधा सुधीर बेटगेरी
बागलकोट

©Sudha  Betageri #sudha
White वेळ  वेळेवरच  रोज  येते ,
वेळेला उशीर  झाला नाही
 
ऋतूचक्रांनी खेळ जो मांडला 
पावसातही पाणी उरले नाही 

भिजले सारे स्वप्न माझे, 
कोरडे सत्य पटले नाही

 शब्द रुसून गेले केव्हाच,
तो वाद आता राहिला नाही

मी माझा म्हणतच राहिले 
तो माझा कधी झाला नाही

जे उरले ते जिंकले मी ,
दोष कुणाला दिला नाही 

सौ. सुधा सुधीर बेटगेरी
बागलकोट

©Sudha  Betageri #sudha