Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5385222360
  • 14Stories
  • 13Followers
  • 61Love
    0Views

जगदिश पुंडलिक भोईर

कवीमन

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

तुझ्या लाजण्याने

तुझ्या अशा लाजण्याने 
मी घायाळ झालो ना
स्पर्षून गालावरच्या खल्या
हृदय छेदून गेल्या ना

डोळ्यात वळवळणाऱ्या बाहुल्या
पापण्यात पडफडल्या ना
मन मोहित अदा तुझ्या 
अंग शहारून तडफडल्या ना

तुझ्या लांब केसांचे जाळे
अडकल्या साऱ्यांच्याच नजरा ना
मोहक फुलांच्या बागेत
मंद दरवळतो मोगरा ना

©जगदिश पुंडलिक भोईर तूझ्या लाजण्याने

#standAlone

तूझ्या लाजण्याने #standAlone

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

निसर्ग

आभाळामंदी साचलय पाणी,
आस लागलीया रानी वनी मनी
कसे धरविले धुखटाकरवी पाणी

धरणीच्या पायी, अंकुरले बीज
गर्भातून तिच्या जन्मे ठायी ठायी
ओलावा आसरा तुझ नवं गुज
निरागस मन हर्षुन गायी गाणी.... कसे धरविले

हिरवीचादर मायेनग घाली
दुधावरली साय जशी जाड होई
झऱ्याचा हा स्पर्श निखलुन जाई
साज चढवला मांगल्याची लेणी
                                       ....... कसे धरविले
तहान भुतास ,चारा मुखी घाली
उगवलीस मातीतून घट्ट अतूटनाती
निवाऱ्यास दिला आधार  गणगोती
जैसी धेनु वासराले गे करी चाटवणी... कसे धरविले

भगवंत आहे  सृष्टीचा नायक
नकोस बडऊ, आता मी पणाचे ढोल
लेबल लावणे सोडून दे  झोल
कुणाचे मोल  लेऊ नये कुणी.......कसे धरविले

©जगदिश पुंडलिक भोईर निसर्ग

#MorningTea

निसर्ग #MorningTea

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

माय मराठी

माझ्या मराठी भाषेचा गजर
वाजूदे डंका तिचा जगभरात
माझ्या मराठीचे बालने घराघरात
अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात
माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात
वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन

मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी
मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी
माझा मान मराठी माझी शान मराठी
माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी

उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा
ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा
भाग्य आम्हास आज बोलतो मराठी
कवीसूर्य कुसुमाग्रजांस
समर्पित,आदरांजली मराठी
                                    
                      @ श्री. ज. पुं. भोईर.*

©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस

मराठी भाषा दिवस

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

कोरानों

येथे पैदास झाली राक्षसाची
काळजी घ्या स्वतःची 
सुरक्षितता बाळगा पोरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

बंद केली दारे जगाची
चालुन केली संधी येथे
दूर दूर पसरला जोरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

 नाक घसा ज्वर आला
जीव मृत्यू चा स्वार झाला
गर्दीत आता नको फिरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

येथे कोण कुणाचे सांगा
जेथे विषाणूचा नाच नंगा
आली चालून संधी चोरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

आकड्यांचाच डाव आला
बंदी बंदिस्त एकेक गाव झाला
तो शोधतो सर्व सान थोरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

आता वापरा  सॅनिटांयझराला
चेहऱ्यावर मास्क घाला
हाच एक उपाय मोठा यारानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

भिऊ नकात तुम्ही आता
आहेत पोलिस,नर्स डॉकरदाता
येतील मदतीस आपुल्या योधानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

तोही रुळला पहा माणसात
डोके काढु पाहतो वर्षात
आता गाफील राहू नका विरानों
खूप खराब आहे चीनचा हा कोरानों

©जगदिश पुंडलिक भोईर कोरानो

#WallPot

कोरानो #WallPot

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

स्वार्थी माणुस

भल्याचे भलेपण आता उरले नाही
माणसाने माणसात विष पेरले काही
मना मनांना विचारांना कोणते औषध उरले नाही

स्वार्थपणाच्या बुद्धीला येथे
काय देणे घेणे उरले नाही
आप आपसात मान मानसात
माणूसपण उरला नाही

दमडीच्या मोलाने येथे
इमान विकले काही
अधिकाऱ्याला ही कोणती
जबाबदारीच उरली नाही

श्रीमंतांचे श्रीमंत इमले चढले
अजून चढतील काही
अस्तित्व शेतकऱ्याचे आज
मरणापूरते ही उरले नाही

महागाईने त्रस्त झाली जनता
सरकारला काय पडले नाही
अरे देश तर गहाण टाकलाच 
वर कर्जाचा बोजा रेटला काही

©जगदिश पुंडलिक भोईर स्वार्थी माणुस

#CalmingNature

स्वार्थी माणुस #CalmingNature

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

चार दाणे वावरात आशेने फेकले होते
तेही पक्षाने जेव्हा भुकेने वेचले होते

पोटास भूक केवढी पोराची ठेऊन आलो
दोन घासासाठी कित्येक प्राण वेचले होते

आभाळाला सांगतो रोज कृपेने बरसरे
ओतून घट नभात ते पाण्याने भरले होते

घामाने भिजलो अन उन्हात पोळलो होतो
पायाला चटके कुठे रगताने चिरले होते

जराशी येऊदे करुणा माझी तुला रे
बावडीच्या तळाशी दोन घोट उरले होते

राबतील,राबले येथे माझ्या पिढ्यानपिढ्या
या मातीतच मीही आयुष्य पुरले होते

एकचं दंडवत तुला शिवारात माझ्या
फुलवलेस मळे जेव्हा नभ बरसले होते

श्रध्दा एवढी माझ्या मनाची मोठी का होती
तेव्हा पाषाणालाही सेंदूर फासले होते

©जगदिश पुंडलिक भोईर आर्त

#WallTexture

आर्त #WallTexture

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

मोती ना शोधत जावे
नवरत्ने पारखीत घ्यावे
आयुष्य मोत्यासारखे अन
रत्नानहूनी मौल्यवान व्हावे

©जगदिश पुंडलिक भोईर सहज सुचली चारोळी

#zindagikerang

सहज सुचली चारोळी #zindagikerang

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

तू रोज दिसावी अन
वाटेत नजर बसावी
काळजा मधील स्पंदनांना
हळुवार कुरवालित जावी
मुक्याने शब्द बोलीत
स्मितहर्ष्याची गाणी गावी
ओंजळीत माझ्या सोबतीला
विसाव्यास यावी
त्या स्पर्शाने तलपलेली भूमी
ऋतूहिरवा होउनी जावी

©जगदिश पुंडलिक भोईर #WallPot
0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

बागेत तुझिया निशिगंध 
पसरला होता
त्या सुगंधाने माझ्या हृदयात
तेव्हा प्रेम शहारला होता
तो ऐकत नाही माझे
येईल सहवास मांगण्याला
तेव्हा माफ करून टाक 
त्याच्या अल्लड वागण्याला
जर असेलही तुझ्या मनी
तर घे त्यासी असऱ्याला
नको जाऊस देऊ त्याला
आड वाणी वेड रस्त्याला वेड जिवा

वेड जिवा

0ed95285ec5742d3177c1f18a3afb576

जगदिश पुंडलिक भोईर

खरं प्रेम व्यक्त नाही केल तर
ते लोणच्यावाणी मुरतंय
अन व्यक्त केल्यावर ते
जीवनात  फुलावाणी फुलतंय खरं प्रेम

खरं प्रेम

loader
Home
Explore
Events
Notification
Profile