Nojoto: Largest Storytelling Platform
amolkakde1228
  • 2Stories
  • 17Followers
  • 10Love
    10Views

Amol Kakde

  • Popular
  • Latest
  • Video
0fdbd6c92929a275357be21d893124a0

Amol Kakde

चंपाषष्ठी

*चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.*

*मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.*

*कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा उत्सव असतो.*

*घटाची स्थापना, नंदादीप,मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे (एकभुक्त), शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण- सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे सहा दिवस केले जाते.*

*चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात.*

*मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.*

*या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धती आहे.*
*स्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

                 *🔸चंपाषष्ठी- २🔸*

*मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो.*

*उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात.*

*पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो.*

*खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते.*

*भाद्रपद शुद्ध षष्ठीस मंगळवार, विशाखा नक्षत्र व वैधृतियोग येत असेल, तर तिलाही चंपाषष्ठी म्हणतात. सुमारे तीस वर्षांनी एकदा अशी चंपाषष्ठी येते. या दिवशी उपवास, सुर्यपूजा व शिवलिंगदर्शन करावे असे सांगितले आहे.*

*स्रोत: मराठी विश्वकोश.*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄

   शास्त्र असे सांगते
-----------------------------------------------------

*🏵 नित्य अथवा नैमित्तिक आन्हिक कर्माचे प्रारंभी आचमनाबरोबर प्राणायामाची अत्यंत आवश्यकता असते, यास कारण काय ? प्राणायामाचे शास्त्रीय स्वरूप काय ?*

           *प्राणायाम करण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने लुप्त होत चालली आहे. धार्मिक कर्माचे वेळी पुरोहित आचमनानंतर "प्राणायामः" असे म्हणण्याचा अवकाश की लगेच एखाद्या माहीतगाराचा आव आणून यजमान आपल्या नाकाला हात लावून मोकळे होतात. इकडे पुरोहित प्राणायामाचे छंद, ऋषी, देवता म्हणतच असतात. आपल्या पठनाचा व यजमानाच्या क्रियेचा काही एक संबंध असतो, याचीही दखल घेण्यास त्यास सवड नसते. तात्पर्य- असा नाटकी प्राणायाम केल्यावर त्याचे खरे मर्मही कळणार नाही व त्याचे प्रयोजनही सफल होणार नाही.*

           *प्राणायामाचे रहस्य विविध क्षेत्रात विविध स्तरावर विशद केले जाते. प्राणायामाचा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे प्राणायामामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. व्यायामामध्ये प्रमुख भूमिका प्राणाची म्हणजे वायूची असते. शरीरास सर्वाधिक अत्यावश्यक असे तीन घटक पदार्थ आहेत. ते म्हणजे अन्न, पाणी आणि वायू होत. या तिन्हीही पदार्थांचे महत्त्व उत्तरोत्तर अधिकाधिक आहे. अन्नावाचून माणूस कित्येक आठवडे जीवंत राहू शकतो. पाण्यावाचून तो काही दिवस जीवंत राहू शकेल; पण वायुवाचून त्याला काही क्षण जिवंत राहणे अशक्य असते. शरीराची संपूर्ण यंत्रणा श्वासोच्छ्वासावर आधारित असते. शरीरात नाकावाटे घेतलेला वायू प्रथम दोन्ही फुफ्फुसात जातो. तेथे त्याचा संपर्क रक्तवाहिन्यातील अशुध्द रक्ताशी येतो. श्वासातील प्राणवायूच्या संपर्कामुळे रक्तातील अशुध्दता नष्ट होते. नाकातील केशजाल व दीर्घनलिका यामुळे श्वासाची उष्णता वाढते व ती फुफ्फुसातील नसानसांतून भरून उरते. शरीरातील वजनाने सर्वात हलका व सच्छिद्र अवयव म्हणजे फुफ्फुस.*

           *श्वासोच्छ्वासाचे वेळी एखाद्या नाळक्याप्रमाणे फुफ्फुसामुळे सर्व अशुध्द भाग शोषला जाऊन तो बाहेर फेकला जातो. त्यावेळी श्वास फुफ्फुसातील सर्व नसांपर्यंत पोचेलच असे नाही. अशा वेळी ज्या नसा प्राणवायूच्या संपर्कास वंचित राहतील, त्यांना काही वर्षांनी कमकुवतपणा येऊन इजा पोचण्याची शक्यता असते. यक्ष्मासारखे फुफ्फुसाचे आजार झालेले रुग्ण प्रायः प्राणायामाची साधना न करणारेच आढळतात.*

           *प्राणायामाच्या पूरक, कुंभक व रेचक या तीन अवस्थांपैकी कुंभक अवस्थेत फुफ्फुसात घेतलेला श्वास काही क्षणातच संपूर्ण फुफ्फुसात एक विलक्षण ऊर्जा निर्माण कतो. दिवसभर काम करून थकल्यावर लागोपाठ सहा प्राणायाम केल्यावर तात्काळ ताजेतवाने वाटते, व थकवा दूर पळतो, हा अनुभव कुणालाही घेण्यासारखा आहे.*

           *प्राणायामाचा दुसरा फायदा म्हणजे श्वाससाधना होय. प्राणायामास नव्याने प्रारंभ केल्यावर श्वास रोखून धरण्याचा जो कालावधी असतो तो हळुहळू वाढत जातो. घड्याळाचा उपयोग करून कालावधीची नोंद ठेवल्यास श्वासावरोधात कशी कशी प्रगती घडते, हे सहज अजमावून पाहता येते. श्वासावरोध म्हणजे कुंभक, जितका दीर्घ होत जाईल, तितकी प्राणायामात प्रगती समजावी. दिवसातील विविध प्रकारच्या आन्हिकात केले जाणारे प्राणायाम संख्येने जितके जास्त तितका प्राणायामाचा अभ्यास सखोल होत जातो.*

           *प्राणायामाचा तिसरा फायदा म्हणजे मानसिक विकास होय. प्राणायामातील विविध अवस्था साधताना मनाची एकाग्रता साधत जाते. कोणत्याही कर्मात मनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्यामध्ये चंचल व हट्टी मनाविषयी म्हटले आहे की, "चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम्।" अशा चंचल मनाला आवर घालण्यासाठी उपयोगात आणली जाणारी बाह्य साधने नेहमीच कुचकामी ठरतात. अशा वेळी केवळ प्राणायामाने मनाला स्थैर्य आणणे शक्य होते. प्राणायामातूनच पुढे चिंतन, मनन, निदिध्यास, ध्यान, धारणा या प्रगत अवस्था साध्य होतात. प्रारंभावस्थेत प्राणायामाचा अभ्यास असतो, तर अंतिम अवस्थेत प्राणविजय असतो. प्राणायामाचे महत्त्व विशद करताना प्रयोग परिजातात म्हटले आहे -*

*पूरके विष्णुसायुज्यं कुम्भके ब्रम्हणोन्तिकम् । रेचकेन तृतीयन्तु प्राप्नुयादैश्वरं पदम् ।।*

           *प्राणायाम करताना पूरकाचे वेळी नाभिकमलस्थित विष्णूचे, कुम्भकाचे वेळी -हदयकमलस्थित ब्रम्हाचे व रेचकाचे वेळी सहस्त्रारस्थित शिवाचे ध्यान करावे. काही साधक तिन्ही वेळी सद्गुरुचे ध्यान करतात. अशा प्रकारे प्राणायाम करताना विश्वाच्या तिन्ही अवस्थांना कारणीभूत असणाऱ्या तिन्ही शक्तींचे ज्ञान व अंतिमतः त्यांचा साक्षात्कार होतो.*

           *प्राणायामाचा चौथा व अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे श्वासोच्छ्वासात एकप्रकारची लयबध्दता येते. एरवी जेथे मोजक्या श्वासोच्छ्वासात भागते, तेथे कितीतरी पटीने आपले श्वासोच्छ्वास चालू असतात. कामक्रोधादि षड्रिपूंशी लढताना तर त्यांची संस्था अमर्याद वाढते. परमेश्वराने एखाद्या जीवाला आयुर्मर्यादा आखून दिलेली असते, असे जेव्हा शास्त्र सांगते, तेव्हा ती आयुर्मर्यादा दिवस, मास, वर्षे यांच्या मोजमापात नसून श्वासोच्छ्वासाच्या संख्येत असते. नियमित प्राणायाम करणारा साधक मोजकेच पण अत्यंत पौष्टिक श्वासोच्छ्वास करून देवाने दिलेली श्वासोच्छ्वास संख्या अधिक काळ वापरत जातो व लौकिकार्थाने दीर्घायुषी ठरतो. उलट कामक्रोधाच्या कर्दमात सापडून त्यांच्याशी लढताना श्वासोच्छ्वासांचा अमाप उपयोग करणारा सामान्य माणूस देवाने दिलेली श्वासोच्छ्वास संख्या ऐन तारुण्यातच उधळून टाकतो व यमराजास निमंत्रण देतो. म्हणून प्राणायामाचा सराव करून दीर्घायुष्य प्राप्त करू घेता येते.*

           *प्राणायामाची तुलना हरिद्वारशी करता येते. ज्याप्रमाणे हिमालयातील बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्री, विविध तीर्थस्थळे, मठ इत्यादी ठिकाणी जाताना प्रथम हरिद्वार लागते, त्याप्रमाणे योगमार्गातील विविध प्रकारचे प्रगत प्राणायाम, सोहं साधना, अजपाजपसाधना, क्रियायोगातील क्रिया इत्यादी सर्व बाबींची सुरुवात नेहमीच्या प्राणायामानेच होते. यास्तव दिनचर्येत तर प्राणायामाचा समावेश केलेला आहेच; पण एरवी देखील मनाला अस्वस्थता वाटल्यास, एखाद्या अनिष्ट घटनेमुळे मनास ताण येत चालल्यास विमनस्कता, दुर्भिती यासारखे मनोविकार बळावल्यास जमतील तितके प्राणायाम अवश्य करावेत.*

*संदर्भ : वेदवाणी 
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

                *🔸हळदीचे महत्त्व.🔸*
    
*हळद ही गुणकारीच आहे. आयुर्वेदांत तर औषधी म्हणून तिला महत्त्व आहेच; पण आपल्या धर्मातही मंगलाचे प्रतिक म्हणून तिला म्हणूणनच स्थान देण्यात आले आहे. आपल्या आहारशास्त्रातही हळदीचे स्थान अढळ आहे. ती अँटीसेप्टीक आहे. धर्मशास्त्रानुसार हळद का महत्त्वाची त्याचे काही मुद्दे.*

 *पूजा करताना हाताला व मानेजवळ हळदीचा छोटा तिलक केल्याने गुरू प्रबळ होऊन वाणी मध्ये शूध्दता येते. हळदिचे दान शुभ मानलं गेलयं. याने प्रकृतीच्या त्रासांवर उपाय होऊन गुरू ग्रहात अनुकूलता येते ज्यांना गुरू वाईट आहे व ऑक्टोबर नंतर खराब आहे त्यांनी हा उपाय करावा.*

*पूजेनंतर कपाळावर हळदीचे तिलक केल्याने कार्यात सफलता मिळते. दरवाज्याच्या कोपर्‍यावर हळदीची रेघ काढल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.*

*आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान केल्याने शारीरिक मानसिक शुद्धता येते. करिअरच्या सफलतेसाठी हा प्रयोग अचूक आहे.*

*हळदीच्या गाठीला तलम कपड्यात गुंडाळून डोक्याजवळ ठेवल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत. बाहेरील वाईट हवेच्या झोतापासून संरक्षण होते. दर गुरुवारी श्री गणेशाला एक चिमूटभर हळद लावल्याने लग्न संबंधातील येणार्‍या अडचणी दूर होतात.*

*भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या प्रतिमेच्या मागे हळदीची पुडी लपवून ठेवल्याने घरात लग्नाचे योग लवकर येतात.*

*हवनात हिचा वापर करतात सूर्याला हळद मिश्रित पाण्याने अर्घ्य दिल्याने मूलीचे लग्न तिच्या मनपसंत मुला सोबत होते.*

*हळदीच्या माळेने कुठचेही मंत्र जाप केल्याने त्या व्यक्तीला विलक्षण ताकद मिळते.*
❄❄❄❄❄🏵❄

                *🔸अठरा पुराणे.🔸*

*मत्स्यपुराण, वायुपुराण, भागवतपुराण, विष्णूपुराण, गरुडपुराण, ब्रह्मपुराण, नारदपुराण, वामनपुराण, कुर्मपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण, मार्कंडयपुराण, शिवपुराण, अग्नीपुराण, वराहपुराण, ब्रम्हांडपुराण, ब्रह्मावैवस्वतपुराण आणि भविष्यपुराण.*

*अठरापुराणांची थोडक्यात माहिती.*

*♦️१-मत्स्यपुराण : भगवान विष्णूने मत्स्यरूपाने मनूला सांगितलेले हे पुराण इ.स.च्या दुसऱ्या ते चौथ्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, आणि त्याचा मूळचा भाग इ.स. पू ६००ते ३०० च्या दरम्यानचा असावा, असे म्हणतात. दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, नासिक वा नर्मदातीर या ठिकाणी ते लिहिले गेले असावे, अशी मते आढळतात. याचे २९१ अध्याय असून श्लोक सु. १४-१५ हजार आहेत. स्वल्पमत्स्यपुराण या नावाने याचे एक संक्षिप्त स्वरूपही आढळते. यात फार कमी प्रमाणात भर पडलेली असून यातील राजवंशाची हकिकत विश्वसनीय आहे. याच्या ५३ व्या अध्यायात सर्व पुराणांची विषयानुक्रमणी आलेली आहे. यात वितृवंश, ऋषिवंश, राजवंश, राजधर्म, हिमालय, तीर्थे इ. विषयांचे वर्णन प्रामुख्याने आलेले आहे.*

*♦️२- वायूपुराण : वायूने सांगितल्यामुळे वायुपुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे, असे डॉ. भांडारकरांचे मत असून काहीजणांनी त्याचा काळ सु.इ.स.३०० हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोदघात, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणात ११२ अध्याय असून त्याची श्लोकसंख्या सू.११ हजार आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचीही वर्णने आढळतात. यात शिवचरित्राचे विस्तृत वर्णन असून भौगोलिक वर्णनांसाठीही हे पुराण प्रसिद्ध आहे.*

*♦️३- भागवतपुराण : भागवतधर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले, असे म्हटले जाते. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले, असेही एक मत आहे. त्याचा काळ इ.स.पू. तिसरे शतक, इ.स.चे पाचवे ते दहावे शतक, असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तमिळनाडूमध्ये लिहिले गेले, असे मत आढळते. १२ स्कंधांत विभागलेल्या या पुराणात सु. १८ हजार श्लोक आहेत. हे पुराण दहा लक्षणांनी युक्त असून कृष्ण हा नायक आहे. भक्ती,तत्त्वज्ञान इ. दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रासपंचाध्यायी इ ,भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषांत व इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. चातुर्मास्यात भागवतसप्ताह करण्याची पद्धत सर्व भारतात आहे.*

*♦️४- विष्णूपुराण : विष्णूभक्तिला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवत पुराणाखालोखाल महत्त्वाचे असून वैष्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्त्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले, असे म्हटले आहे. इ.स.च्या ३ ते ५ या शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. बलदेव उपाध्यांच्या मते इ.स.पू. दुसरे शतक हा त्याचा काळ होय. हे पुराण सहा अंशांत विभागलेले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत सुमारे सहा-सात हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुराणाइतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाही.यात अनेक आख्यानांबरोबरच कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे.*

*♦️५- गरुडपुराण : विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने या पुराणाद्वारे वैष्णव तत्त्वांचे वर्णन केले, म्हणून याला गरुडाचे नाव प्राप्त झाले. हे इ.स.च्या सातव्या चे दहाव्या शतकांत तयार झाले असावे, असे दिसते. डॉ हाझरा यांच्या मते हे मिथिलेत लिहिले गेले. याचे अध्याय २६४ असून श्लोक सु. ७ हजार आहेत. याच्या पूर्वखंडात व्याकरण, छंद साहित्य, वैद्यक इ. विषयांची माहिती असल्यामुळे हे विश्वकोशात्मक बनले आहे. याच्या उत्तरखंडाच्या 'प्रेतकल्पा' त और्ध्वदेहिराची माहिती आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसापर्यंत घरी गरुडपुराणाचा पाठ करण्याची प्रथा आहे. याच्या उत्तरखंडाचे जर्मन भाषांतर झाले आहे.*

*♦️६- ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण म्हटले जाणारे हे पुराण पुराणांच्या यादीत पहिले असल्यामुळे त्याला 'आदिपुराण' म्हटले जाते. त्यात सूर्योपासना वर्णिलेली असल्यामुळे त्याला सौरपुराण असेही म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावांच्या उपपुराणांहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्यपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत, असे एक मत आहे. हे पुराण इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांपुर्वी बनले असावे आणि दहाव्या, बाराव्या व पंधराव्या शतकांत त्यात भर पडली असावी; त्याचा काही भाग ओरिसात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा इ. मते आढळतात.या पुराणात २४५ अध्याय असून सु. १४ हजार श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्यतत्त्वज्ञान, वैदिक ग्रंथांतील उपाख्याने इ. महत्त्वाचे विषय आले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थांचे माहात्म्य १०६ अध्यायांत आले आहे.*

*♦️७- नारद पुराण : या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण, नारदपुराण आणि बृहन्नारदीयपुराण अशी समान नावांची तीन पुराणे आढळतात. यांपैकी महापुराण कोणते, यांविषयी संदिग्धाच आहे. यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ.स.७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात. याचे दोन भाग असून पूर्वभागात १२५ आणि उत्तरभागात ८२ अध्याय आहेत. यातील श्लोकसंख्या बलदेव उपाध्यायांच्या मते २५ हजार तर पां.वा. काणे यांच्या मते ५,५१३ इतकी आहे. याच्या ९२ ते १०९ या अध्यायांत १८ पुराणांची विस्तृत विषयानुक्रमणी आलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झाले आहे.*

*♦️८- वामनपुराण : यात वामनावताराचे वर्णन विशेषत्वाने असून पहिल्या श्लोकात वामनालाच नमस्कार केलेला आहे. हे पुराण पुलस्त्य ऋषीने नारदाला सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या वा सहाव्या ते नवव्या शतकांत हे पुराण तयार झाले असावे, अशी मते आढळतात. याची निर्मिती कुरुक्षेत्राला परिसरात झाली असावी, असे दिसते. याच्या उपलब्ध प्रतींत ९५ अध्याय व सुमारे ६ हजार श्लोक आहेत. याचा उत्तर भाग लुप्त झाला आहे. यात शैव, कालदमन, पाशुपत व कापालिक अशा चार शैव संप्रदायाचे वर्णन असून वैष्णव व पाशूपत शैव या दोहोंना समान महत्त्व दिलेले आहे. यात असुरांच्या कथा असून शिवपार्वतीचे विस्तृत चरित्र आलेले आहे. कालिदासाचे कुमारसंभव व वामनपुराण यांत बरेच साम्य आढळते.*

*♦️९- कूर्मपुराण : विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला हे पुराण सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या दुसऱ्याक, पाचव्या वा सहाव्या-सातव्या शतकांत ते तयार झाले असावे, अशी मते आहेत. याचे पूर्वार्ध (५३ अध्याय) व उत्तरार्ध(४६ अध्याय) असे दोन भाग असून उपलब्ध ग्रंथात सुमारे ६ हजार श्लोक आहेत. नारदसूचीप्रमाणे याच्या ब्राह्मी, भागवती, सौरी व वैष्णवी अशा चार संहिता होत्या; परंतु सध्या फक्त ब्राह्मी संहिताच उपलब्ध आहे. याचे नाव वैष्णव असले, तरी हे शैवपुराण असल्यामुळे शिव व दुर्गा याचे माहात्म्य हेच याचे मुख्य विषय आहेत. यात पाखंड मते दिलेली असून वाममार्गीयांच्या यामलयंत्र या ग्रंथाची माहितीही दिलेली आहे. याच पुराणात 'ईश्वरगीता' व 'व्यासगीता' अशा दोन गीता आलेल्या आहेत. तेनकाशीच्या एका राजाने सोळाव्या शतकात या पुराणाचे तमिळमध्ये भाषांतर केलेले आहे.*

*♦️१०- पद्मपुराण : या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुराणांत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्या पुराणाचा बराचसा भाग इ.स.च्या पाचव्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आहे; आणि त्याचा उत्तरखंड मात्र सोळाव्या शतकानंतरच्या असावा, असे मत आढळते. बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतींत आढळणारे हे पुराण सुमारे ५५ हजार श्लोकांचे असून श्लोकसंख्येच्या बाबतीत ते स्कंदपुराणाखालोखाल आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असून त्याचे ६२८ अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे सहा खंड मानले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा व तीर्थमाहात्म्ये हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत.उत्तरखंडाला जोडलेले 'क्रियायोगसार' हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शांकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे, असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात.*

*♦️११- स्कंदपुराण : स्कंदाने सांगितल्यामुळे त्याचे नाव मिळालेले हे पुराण इ.स.च्या सातव्या व नवव्या शतकांच्या दरम्यानचे असावे, असे म्हटले जाते. सर्व पुराणांत आकाराने मोठे असलेले हे पुराण ८१ हजार श्लोकांचे आहे. ते सनत्कुमार, सुत, शंकर, वैष्णव, ब्राह्मव सौर अशा सहा संहितांमध्ये विभागलेले असून माहेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, तापी व प्रभास या सात खंडांतील दुसरीही एक विभागणी आढळते. याच्या सूतसंहितेत ब्रह्मगीता व सूतगीता आहेत, तर रेवाखंडांत सत्यनारायणव्रताची कथा आहे.*

*♦️१२- मार्कंडेयपुराण : मार्कंडेय ऋषींनी सांगितल्यामुळे त्यांचे नाव प्राप्त झालेले हे पुराण अत्यंत प्राचीन असून त्याचा प्राचीन भाग इ. स. तिसऱ्या शतकाच्याही आधीचा असावा, असे म्हणतात. बलदेव उपाध्यायांच्या मते गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविण्यारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकांत झाले असावे. ते गोदावरीच्या उगमप्रदेशांत लिहिले गेले असावे, असे मत आढळते.यात सामान्यतः पंचलक्षणे आढळत असून केवळ १३७ अध्यायांच्या या पुराणात सुमारे ६,९०० श्लोक आहेत. यात द्रौपदीचे पंचपतित्व, तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या इ. प्रश्नांची चर्चा असून हरिचंद्र ब्रह्यवादिनी मदालसा, कृष्ण, मार्कंडेय इत्यादींच्या कथा आहेत. अग्नि, सूर्य, देवी इत्यादींची स्तोत्रे असून 'दुर्गासप्तशती' या नावाने विख्यात असलेले देवीमाहात्म्य १३ अध्यायांत वर्णिलेले आहे. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केलेले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषेतही भाषांतर झाले आहे.*

*♦️१३- लिंगपुराण : शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून या पुराणाद्वारे मोक्षादींचे विवेचन केले, या समजुतीमुळे याला लिंगपुराण हे नाव मिळाले आहे. याचा काळ सुमारे सातवे-आठवे शतक असण्याची शक्यता आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्धा असे दोन भाग असून, पूर्वार्धाचे १०८ व उत्तरार्धाचे ५५ अध्याय आहेत. त्यांपैकी उत्तरार्धाचे काही अध्याय गद्य आहेत. याची श्लोकसंख्या सुमारे अकरा हजार असून सुमारे सहा हजार श्लोकांचे आणखी एक छोटे लिंगपुराण होते, असे दिसते. यात ब्रह्मांडरुपी लिंगाची उत्पती, लिंगपूजा, शैवव्रते, शिवाचे २८ अवतार, काशीचे वर्णन, तंत्रविद्या इ.विषय प्रामुख्याने आले असून हा लिंगायतांचा एक प्रमुख धर्मग्रंथ मानला जातो.*

*♦️१४- अग्निपुराण : अग्नीने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नीचे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, असे म्हणतात. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगालात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे, असे एक मत आहे. ३८३ अध्यायांच्या या पुराणात पंचलक्षणे आढळत असली, तरी परा व अपरा विद्यांचे वर्णनच महत्त्वाचे आहे. रामायण व महाभारताचे सार, बुद्धावतारासह इतर अवतार इ.विषयांबरोबरच छंद, व्याकरण, अलंकार, योग, ज्योतिष मंदिरे, मूर्ती, धर्म इत्यादींची शास्त्रे यात वर्णिलेली आहेत. यात गीतासार व यमगीता आलेली असून आयुर्वेद, वृक्ष आणि पशूंचे वैद्यक, रत्नपरीक्षा, धनुर्विद्या, मोहिनी व इतर काही इ. विषयांचे विवेचन आलेले आहेत.*

*♦️१५- वराहपुराण : वराहावतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत असून, ते नवव्या- दहाव्या शतकांत तयार झाले असावे आणि त्याचा काही भाग अकराव्या व काही भाग पंधराव्या शतकातील असावा, असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा नेपाळात लिहिला गेला असावा, असा तर्क आढळतो. याचे गौडीय व दक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. याचे २१८ अध्याय असून त्यांपैकी काही गद्यात्मक आहेत, तर काहींमध्ये गद्य व पद्य यांचे मिश्रण आहे. यात २४ हजार श्लोक असल्याचा उल्लेख आढळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सुमारे १० हजार श्लोकच आढळतात. व्दादशीच्या व्रतासारखी अनेक वैष्णव व्रते यात असून रामानुज संप्रदायाने यातून अनेक वैष्णव अनेक विषय स्वीकारले आहेत. यात मथुरामाहात्म्य, नचिकेत्याने उपाख्यान इ. विषय प्रामुख्याने आले आहेत.*

*♦️१६- ब्रह्मांडपुराण : ब्रह्मांडाची उत्पती आणि विस्तार यांचे वर्णन हा याचा मुख्य विषय असल्यामुळे याला ब्रह्मांड हे नाव मिळाले आहे. हे वायूने व्यासांना सांगितले असल्यामुळे याला वायवीय ब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. वायु व ब्रह्मांड ही पुराणे एकच असून वायुपुराणात थोडा फरक करून ब्रह्मांडपुराण बनविलेले आहे. त्यातील परशुरामचरित्राचा भाग हा वायुपुराणापेक्षा अधिक आहे. इ.स.च्या चौथ्या, पाचव्या व सहाव्या शतकात हे तयार झाले असावे, अशी मते आहेत. गोदावरीच्या उगमाचा प्रदेश वा सह्याद्री हे याचे निर्मितिस्थान असावे, असे दिसते. याचे प्रक्रिया, अनुषंग, उपोदघात व उपसंहार असे चार पाद असून श्लोक सुमारे १२ हजार आहेत. यात परशुराम व कार्तवीर्य यांचा संघर्ष. ललितादेवीचे आख्यान, क्षत्रियराजवंशाचे वर्णन इ. विषय प्रमुख आहेत. अध्यात्मरामायण हा ग्रंथ आणि ललिता सहस्त्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ. भाग या पुराणातून घेतलेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांतील भाषेत त्याचे भाषांतर झाले असून ते अजूनही तेथे प्रचारात आहे.*

*♦️१७- ब्रह्मवैवर्तपुराण : कृष्णाने ब्रह्याचे विवरण केल्याचे वर्णन यात असल्यामुळे याला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. याला दक्षिणेत ब्रह्मकैवर्तपुराण असे म्हणतात. आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. आठवे, नववे वा दहावे शतक हा त्याचा काळ मानलेला असून काहींच्या मते ते पंधराव्या शतकानंतरचे आहे. बहुधा बंगालमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुराणाविषयी बंगाली वैष्णवांना फार आदर आहे. याचे २७६ अध्याय असून श्लोक सुमारे १८ हजार ( एका मतानुसार सुमारे १० हजार) . ब्रह्म, प्रकृती, गणेश व कृष्णजन्म अशा चार खंडांत विभागलेल्या या पुराणाचा कृष्णजन्म खंड १३३ अध्यायांचा आहे. यात गणेश हा कृष्णाचा अवतार मानलेला असून उत्तान रासक्रिडा, अनेक माहात्म्ये इ. गोष्टी आढळतात.*

*♦️१८- भविष्यपुराण : वस्तुतः पुराण हे प्राचीन असल्यामुळे भविष्यपुराण या नावात आत्मविसंगती आहे. परंतु भविष्यकालीन घटनांची व व्यक्तिंची वर्णने करण्याची भूमिका घेतल्यामुळे याला भविष्यपुराण हे नाव मिळाले आहे. भविष्योत्तर पुराण या नावाचे एक स्वतंत्र पुस्तक असून काहींच्या मते ते भविष्यपुराणाचे उत्तर पर्व आहे. काहीच्या मते ते स्वतंत्र पुराण आहे. याचा काळ सुमारे सहावे-सातवे वा दहावे शतक हा मानला जात असला, तरी आपस्तंब धर्मसूत्रात त्याच्या नावनिशी उल्लेख असल्यामुळे त्याचा निदान काही भाग तरी अत्यंत प्राचीन असला पाहिजे. नारदपुराणानुसार याची ब्राह्म, विष्णू, शिव, सूर्य व प्रतिसर्ग अशी पाच पर्वे असून श्लोकसंख्या सुमारे १४ हजार आहे. याच्या वेगवेगळ्या चार प्रती मिळालेल्या आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा यात जास्त भर पडली असल्यामुळे याचे मूळचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यात इंग्रजी अमदानीतील घटनांचीही वर्णने आली आहेत. उदा, व्हिक्टोरिया राणीला यात विकटावती म्हटले आहे, तर रविवारला संडे म्हणतात, असे सांगितले आहे. यात सूर्योपासना विशेषत्वाने आली असून कित्येक घटनांची व राजवंशांची वर्णने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

            *🔸दत्तात्रेयांचे अवतार.🔸*

          *🔸५) योगीजनवल्लभ.🔸*

*या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे.*

*जन्म:- मार्गशीर्ष शुद्ध१५*

*अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी इंद्रादी देव, ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले. त्या सर्वांची ती उत्सुकता पाहता, श्री दत्तात्रेय एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले.*

*"मी शरीररूप (स्थूल) नाही, मी समयघटिका ही नाही. मी जन्म आणि मृत्यू रहित आहे. (मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परीमाणीत गोष्टींच्या च्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलिकडील आहे.) भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरी ही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही." हे अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे.*

*म्हणूनच या अवतारला 'योगिजन वल्लभ' म्हणून ओळखले जाते. (योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत.)*

*हीच दत्तजयंती म्हणून आपण साजरी करतो.*

*सुरगणादिवंदिताय | बालरूपा निरंजना ।।*
*योगिजन-वल्लभावताराय | दत्तात्रेयाय नमो नम: ।।*

*सुरगण म्हणजे देव - ऋषिंद्वारे वंदिल्या गेलेल्या, बालरूप आणि निरंजन म्हणजे ज्यात कुठलेही अं?

©Amol Kakde #bipinrawat
0fdbd6c92929a275357be21d893124a0

Amol Kakde

Laxmi engineering works Dhanora contact number 9763144960

Laxmi engineering works Dhanora contact number 9763144960 #सस्पेन्स

37 Views


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile