Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8578536402
  • 19Stories
  • 48Followers
  • 66Love
    0Views

पूजा शिंपी बागुल

ग्राफिक्स डिझाईनर

  • Popular
  • Latest
  • Video
13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

तुझे रंग रूप
फसवे कपटी स्वरूप..
तुझे हातवारे बोलणे
 तसेच वागणे अनुरूप..

तू घातलेला पेहराव
आणि रंगाचा मुखवटा..
तुझे वागणे लोचट
तूच उघडलेल्या भोगवटा..

तुझे भासवणे उपासक
पण असणे खरे आसक्त..
तुझे डोळे काळे निळे
तू गोरख बगळा भक्त..

श्वापदच तू खरा शोभतो
तुला आता ठेचायलाच हवा..
थांबतील तेव्हाच तुझे 
मिळेल मोकळा श्वास तेव्हा..
*पूजा शिंपी बागुल* कविता

कविता

6 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

कागदास कोरे करायचं आहे..

त्यांच्या प्रतिष्ठेचा बुरखा 
आता फाडायचा ठरवलंय..
न जमले जरी कदाचित
तरी डांबर फासायचं ठरवलंय..

ह्यांनीच बेरंग केले आहेत
रंग सारेच सृष्टीचे..
मातीशी बेईमान झाले
त्यांना मातीतआता गडायचं आहे..

पद,प्रतिष्ठा, पैसा
याचा दुरुपयोग करतात..
त्यांचे आसन हे सुरक्षित
दोलायमान करायचं आहे..

सृजनतेचे बुरखे पांघरून
घुसलेले जणू आतंकवादी
कंठस्नान घालून त्यांना
कागदास कोरे करायचं आहे..
*पूजा शिंपी बागुल* कविता

कविता

5 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

गत वर्षाला निरोप देताना..

गत वर्षाला निरोप देताना
गगन लाभो नवस्वप्नांना..
बळ मिळो पंखांना
सुखदुःखाचे घाव पेलताना..

जाऊ दे दूर सरून
तिमिर साऱ्या विश्वाचा..
होऊ दे उदय नव्याने
आश्वासक नव्या सूर्याचा..

वाद मिटावे मनामनाचे
भेदाची दरी मिटून जावी..
काय पुरुष अन् काय स्त्री
सन्मानाची एक नजर मिळावी..

निर्भय व्हावे जग हे सारे
बागडावी त्यात सारी लेकरे..
गाडून टाकावे मातीत खोल
काटे कुंपणावरचे सारे..

आले जरीही वादळ मोठे
हात सारे एकसंध व्हावे..
फडफडणाऱ्या ज्योतीला
जाणीवपूर्वक तेवत ठेवावे..
पूजा शिंपी बागुल कविता

कविता

5 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाचणारा वाचतो..
पण काळाच्या कसोटीवर
वरवर लख्ख दिसणारा हा आरसा सहज धूसर होतो.?*पूजा शिंपी बागुल लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाचणारा वाचतो..
पण काळाच्या कसोटीवर

लिहता हात समाजमनाचा लख्ख आरसा असतो.. पण नकळत का स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो.. दुर्दैवाने म्हणावे लागतेय की लिहिणारा लिहतो आणि वाचणारा वाचतो.. पण काळाच्या कसोटीवर #Quote

4 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

नात्यापालिकडचे..

नात्यापालिकडचे नाते
तुझे नि माझे नाते..
भ्रमरापरी तुझे उडणे
जाग्यावरती खिळणे..

फुलण्याचे मला वेड
तुला मिटण्याची घाई..
माझे स्वप्न उडण्याचे
दवात भिजून जाई..

मला जमवण्याचा छंद
नकाे ओरबाडू मकरंद..
स्वभावा असावा धरबंध
मलाही जगू दे स्वच्छंद..
*पूजा शिंपी बागुल* कविता

कविता #poem

4 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

श्वापद..

मी ओळखले तुझे रंग रूप
फसवे कपटी स्वरूप..
तुझे सांकेतिक बोलणे
आणि तसेच वागणे अनुरूप..

तू घातलेला शुभ्र पेहराव
आणि रंगाचा मुखवटा..
तुझे वागणे भयंकर लोचट
आणि तू उघडलेला भोगवटा.

तुझे भासवणे उपासक
पण असणे खरे आसक्त..
तुझे निलाजरे डोळे काळे
आणि जिभेला लागलेले रक्त.

श्वापदच तू खरा शोभतो
तुला आता ठेचायलाच हवा..
थांबतील तेव्हाच तुझे चाळे
मिळेल मोकळा श्वास तेव्हा..
पूजा शिंपी बागुल कविता

कविता

6 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

कळी संगमयुगाची 
प्रकाशात फुलत गेली..
अध्यात्माच्या किरणात
नखशिखांत न्हाऊन गेली..

राजयाेग तेज लेवून
चंदनापरी दरवळले..
बाबा तुमच्या चरणी
स्वतःस मी अर्पण केले..            

निर्माल्य जरी जाहले
ह्या नश्वर माझ्या देहाचे..
तरी बाबांच्या कृपेने
सार्थक झाले जन्माजन्माचे..
*पूजा शिंपी बागुल* बाबा

बाबा

1 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

कळी संगमयुगाची 
प्रकाशात फुलत गेली..
अध्यात्माच्या किरणात
नखशिखांत न्हाऊन गेली..

राजयाेग तेज लेवून
चंदनापरी दरवळले..
बाबा तुमच्या चरणी
स्वतःस मी अर्पण केले..            

निर्माल्य जरी जाहले
ह्या नश्वर माझ्या देहाचे..
तरी बाबांच्या कृपेने
सार्थक झाले जन्माजन्माचे..
*पूजा शिंपी बागुल* बाबा

बाबा

0 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

प्रिया एका सामाजिक संस्थेशी निगडित एका ऑफिसमध्ये काम करत होती..
ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती म्हणून प्रिया लगबगनीचे सर्व काम पार पाडीत होती. इतक्यात केबिनच्या दरवाजावर  टकssटक झाली.. व पलीकडून आवाज आला..
आत येऊ का? प्रियाने होकार देताच ती व्यक्ती आत आली.. ती एक स्त्री होती.. तिच्या  हातात फाईल्स होत्या चेहर्यावर काहीशी उदासी होती. ती आत येताच प्रिया म्हणाली, या मँडम बसा! पाणी घ्या!  ती बाई जरा घाबरत खुर्चीवर बसली. ती बसल्यावर जर रिलॅक्स झाल्यावर प्रिया म्हणाली,  बोला मँडम काय काम आहे?  ती  बाई हातातील फाईल प्रियाच्या हातात देत म्हणाली,  मँडम आपल्या न्युज पेपर मधील बातमी वाचली  म्हणून शिफारस पत्र घेऊन आले आहे.  अच्छा म्हणजे तुम्हाला पुरस्कार हवा तर ? खरं  प्रिया निष्पाप होती बाहेरचं जग तिला पूर्णतः माहित नव्हतं. नुकतंच शिक्षण पूर्ण करून ती   त्या आँफिस मध्ये लागली होती.
  प्रिया एक सरळ मार्गी मुलगी होती. ऑफिसमध्ये धुर्त मार्गाने  पैसा कमवत, नाव मोठे  करण्यासाठी तिचा मालक खोटा मार्ग अवलंबत होता. याची कल्पना प्रियाला नव्हती. काही लोक तसे म्हणतही होते  पण यावर प्रियाचा विश्वास बसत नव्हता.  ऑफिस वर्कच्या नावाखाली आतून तडजोड करत प्रियाला अंधारात ठेवून तिच्या कडून कामं करून घेत होता. 
समोर बसलेल्या बाईलाही पुरस्कार हवा होता. पण नियमानुसार मुदत संपून गेली होती. तिने तसे समाेर बसलेल्या बाईला सांगितले.. म्हणाली मॅडम, शिफारस पत्र घेण्याची मुदत केव्हाच संपली आहे. तरीही मी सरांना विचारून बघते. त्यांनी होकार दिला तर तस तुम्हाला कळवते. तुम्ही बस इथेच मी सरांकडे जाऊन येते.
काही वेळात प्रिया सरांकडे जाऊन आली व बाईला म्हणाली, मॅडम! सर म्हणाले की पत्रिका आधीच डिझाईन साठी गेलेली आहे. नावेही सिलेक्ट झाली आहेत. पण तरीही तुम्ही इच्छुक असाल तर काही रक्कम द्यावी लागेल. प्रियाच्या प्रस्तावाला ती बाई लगेच तयार झाली. व तिने विचारले की रुपये द्यावे लागतील? त्यावर प्रिया म्हणाली, ते मला माहित नाही. तुम्ही सरांना जाऊन प्रत्यक्ष विचारून घ्या. नंतर आपली माहिती घेऊन माझ्याकडे या. 

प्रियाने म्हटल्या प्रमाणे ती बाई सरांच्या केबिनमध्ये गेली व नंतर हसतमुखाने बाहेर येत प्रियाच्या केबिनमध्ये आली. सरांनी सांगितल्या प्रमाणे तिने आपली माहिती एका कागदावर लिहून शेवटी एक चारोळी लिहून तो कागद तिने प्रियाकडे सुपूर्द केला.. 
प्रियाने तो कागदावरील मजकूर वाचला तसेच शेवटची चारोळी सुद्धा वाचली व तिने त्या बाईला विचारले, मॅडम! आपण कविता लिहता? त्यावर मॅडम हसतमुख म्हणाल्या, हो! म्हणजे अगदी अलीकडेच लिहू लागलीय. 
तिचं नवखेपण तिच्या लिखाणात जाणवत होतं पण तसे न दर्शविता प्रिया म्हणाली,छान आहे लिखाण. त्यावर ती बाई हसली व म्हणाली धन्यवाद. खरं तर मी नवखी असून मला पुरस्कार मिळतोय याचा खूप आनंद होतोय. साहेबांशी याबाबत आधी बोलणं झालं होतं म्हणून मी आले. पण साहेब म्हणाले तसे करून दाखवले. असे म्हणून ती बाई निघून गेली.

ती निघून जातात प्रियाने इतर नामावली पडताळून पाहिली तसेच त्यांचे लिखाणही पाहिले आणि कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण श्रेय नामावलीत एकही दर्जेदार साहित्यिक नव्हता. ती तडक साहेबांच्या केबिनमध्ये गेली व आपली शंका तिने साहेबांच्या कानी टाकली तसे साहेब तिला समजावत म्हणाले. हे बघ प्रिया, इतका मोठा इव्हेंट करणार आहोत आपण की त्यास बरेच मान्यवर येणार आहेत. त्यात सिने कलावंत पण असणार आहेत. मग त्यासाठी निधी पण मोठा लागणार.  
साहेबांच्या म्हणण्यावर प्रियाने होकारार्थी मान हलवली. तसे साहेब पुढे म्हणाले, मग त्यासाठी थोडी तडजोड करावीच लागते शिवाय आपण नवोदितांना व्यासपीठ मिळवून देतोय, त्यांना प्रोत्साहित करतोय. 
साहेबांचं उत्तर प्रियाला पटले नाही व ती म्हणाली,पण साहेब मग दर्जाचं काय? त्यावर साहेब हसून म्हणाले,आता ते नवोदित आहेत. आपण लगेच त्यांच्याकडून दर्जाची अपेक्षा कशी ठेवणार ना. हळूहळू होतील दर्जेदार. त्यावर प्रिया म्हणाली, मग अशा इव्हेंटमुळे साहित्याची हानी नाही? त्यावर साहेब हसत म्हणाले, आपण फायद्याची बाजू उचलून धरली की हानीचे पारडे आपोआप खाली जाते. हे तुला कळणार नाही. तुला त्याचा इतका अनुभव नाही. तू फक्त तुला दिलेल्या कामाकडे लक्ष दे. 
प्रियाच्या परखड प्रश्नांनी साहेबांचा पारा चढला. बिचारी हतबल प्रिया मुकाट आपल्या जागेवर येऊन बसली. काही दिवसात ठरल्याप्रमाणे इव्हेंट समारोह सुरू झाला. प्रिया सुद्धा त्या समारोहाला हजर होती. ती सर्व रंग ढंग पाहत होती. कोणी अभिनेत्री आणून तिच्या हस्ते एक  ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट देण्यात आली. पुरस्कार घेणारा आणि देणारा दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून प्रिया मात्र व्यथित होत होती. ती विचार करू लागली की, एवढा थाटमाट अंतर्मनाला खरंच समाधान देतो का? हा दर्जेदार लिहणाऱ्यांवर अन्याय नाही का?खोटंच  बाजारात खपतं
 ते ही जास्त किमतीत
एखाद्या कडे १०० गोष्टी असतात पण दाखवता दहाच येतात
मात्र एखाद्या कडे दहागोष्टीच  असतात त्याला १०० करून 
सत्य कधीही सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं मात्र ओरडून ओरडून सांगतं त्यालाच लोकं सत्य समजतात.  हे निश्चित. साहित्याच्या तळ्यात असे कितीतरी नवोदित मासे आहेत जे स्वतःहून गळाला लागायला आतुर आहेत म्हणूनच आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्या साहेबाचे फावते आहे. 
आपल्याच विचारात गर्क असता ती ऑफिसमध्ये भेटलेली बाई समोर आली व म्हणाली, मॅडम ही माझी कवितांची फाईल. साहेबांनी कविता संग्रह प्रकाशित करण्याचा शब्द दिलाय. तिची कवितांची फाईल घेऊन तिने ती चाळली आणि तिला अंदाज आला. ती हसली व म्हणाली, बरं ठीक आहे. मला सांगा पुरस्कारासाठी किती तुमच्याकडून किती पैसे घेतले गेले? त्यावर ती बाई म्हणाली, जास्त नाही फक्त पाच हजार. तिचे ते बेफिकरीचे उद्गार ऐकून प्रिया मात्र अवाक झाली. ती मनात म्हणाली, काय  हौस असते. 100 रुपयाच्या पुरस्कारासाठी लोकं पाच हजार मोजायला तयार आहेत. चिखल साचायला सुरवात झालीय पण  त्याची दलदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. पुरस्काराचा हा तिरस्कार त्यांनाच लाभ जे हापापलेले आहेत.. इथल्या अंधेर नगरीत सचोटीचं काम नाही प्रिया .प्रकाश पुंजक्याच्या शोधात...
*पूजा शिंपी बागुल* आर्टिकल

आर्टिकल

0 Love

13099878b73a0911f9a6726155694b73

पूजा शिंपी बागुल

*डायरी*                                                                                     मी समर्पित केली 
डायरी नदीच्या प्रवाहात
नकोच त्या आठवणी
जाईनात का दूरवर वाहत..

एक एक पान फेकून दिले
फाडून,चुरगळुन नष्ट केले..
पाणावल्या डोळ्यांच्या कडा
शब्द त्यातून उमटले..

ही किमया कसली होती 
शब्दांची का माझ्या भावनांची..
कविता अजूनही तरून आहे
अन् डायरी झालीय ह्या देहाची..
पूजा शिंपी बागुल डायरी

डायरी #poem

6 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile