Nojoto: Largest Storytelling Platform
avinashlad2229
  • 16Stories
  • 4Followers
  • 123Love
    647Views

Avinash Lad

  • Popular
  • Latest
  • Video
20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

Red sands and spectacular sandstone rock formations गावं खेडे...
------------------

अवती भवती फिरता
चाहूल लागे येण्याची,
कानी पडे साद हळवी
प्रेमळ माझ्या आईची...

सळ सळ सळ सळ
वारा येई  गात गाणी,
अंगण दिसे रंगीबेरंगी
 कोमेजल्या पाना फुलांनी...

दूर दूरच्या पायवाटा
ओढ लाविते गावाकडची,
डोंगर दरी कपारी सांगे
गम्मत जिवलग मित्रांची...

मन सैर भैर क्षणात होता 
तेथे मैफिल असे पक्षांची,
दाहीदिशा हिंडत गेलो तरी
मौजमस्ती बालपणाची...

नातीगोती बांधून सारी
शोभा वाढे आयुष्याची,
निवांत बसता क्षणभर
खळी खुले गालावरची...

झाडं वेली गवतफुलांनी
रांगोळी घालती चहुकडे,
दुरूनही आरोळी देतो
सुंदर हसोळ गावं खेडे...

----------------------------------
कवी- लेखक: अविनाश लाड, राजापूर- हसोळ

©Avinash Lad
  गाव खेडे

गाव खेडे #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

स्पर्श मातीचा...
----------------------------
माझ्या हसोळ गावात
वाहे पाणी  झुळझुळ 
चव अवीट लागते
पाट बोले खळखळ

वनराई रुबाबात
दरी खोऱ्याच्या संगती
फुलवेली चहूकडे
तनमन हासवती

घर कौलारू बाबांचं
तेथे शोभे आजीबाई
घर सारवी जोशात
माझी मालकीण आई

शेणा मुताच्या वासाने
ओढ लागते गावाची
गोट्यामध्ये गाई म्हशी
साद घालती सुखाची

गंध कपाळी लावूनी
स्पर्श मातीचा करतो
माळरानं हिंडताना
थवा पक्षांचा पाहतो

चिऊताई, मैनाबाई
सूर  आनंदी लावती 
सांज अंगणी दिसता
घरा परतून जाती

चहूकडे हिरवळ
स्वर्ग सुखाचे कोकण
झाडवेली फुलवेली
करी आनंदित मन 

अभिमान वाटे मज
जन्म झाला कोकणात
ओढ मनात रुजली
गावं दिसता डोळ्यात

__________________
श्री.अविनाश लाड, राजापूर-हसोळ

©Avinash Lad
  स्वर्ग सुखाचे कोकण...

स्वर्ग सुखाचे कोकण... #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

काळी माय..

काळी माय.. #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

दोन जीवांची मैफिल...
________________

सय घालीते फुगडी
    घुमे पैंजणांचा नाद
      वारा नाचतो अंगणी
         तुझी देऊनिया साद

घुसमट ह्या श्वासाची
    भेट व्हावी चांदण्यात
          चंद्र दावी पायवाट
            माझ्या भरल्या डोळ्यात

येग माळून मोगरा
      तुझी चाहूल देऊनी
          रूप तुझे चांदण्यात
             जणू शुक्राची चांदणी

नको खेळ खेळू आता
    चंद्र लपला आभाळी
       दोन जीवांची मैफिल
          तेव्हा रात्र होई काळी

मन आनंदी आनंद
   तुझ्यासंगे बिलगता 
       देह प्रेमात भिजल
          रात्र चालता चालता

___________________

विठूपुत्र: अविनाश लाड

©Avinash Lad दोन जीवांची मैफिल...

दोन जीवांची मैफिल... #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

पांडुरंग..
_________________

बाप सुखाची सावली
माय वारा थंडगार 
उभे आयुष्य राबून
मुखी अमृताचा सूर

सर घामाची गाळून
घाव उरात सोसती
माझ्या हास्याचा मलम
मन थकता लावती

बाप डोंगर कपारी
माय नदी अमृताची
माझ्या डोळ्यात बघून
लावी भविष्याच्या वाती

चूल जोशात पेटवी
माय मारून फुंकर
घरदार सजवते
कटी बांधून पदर

माय रखुमाई माझी
बाप माझा पांडुरंग 
घरामध्ये ही पंढरी
त्यात मीही झालो दंग

थोर पुण्याई लाभली
भक्त पुंडलिक झालो
दास होऊन देवांचे
पोटी जन्मा बाळ आलो

_________________
विठूपुत्र:अविनाश लाड

©Avinash Lad पांडुरंग..

#Top

पांडुरंग.. #Top #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

शब्दफुलें
___________________
माझी पुस्तके जरा तू
बघ निवांत येऊन
शब्दफुलें वेचलेली
कळतात का वाचून

रोज ओंगळतो अश्रू
माळरान चालतांना
तुला पाहत असतो
शब्दफुलें वेचताना

मैफिलीत नव्याने मी
तुला पाहिले गाताना
तूच निवांत होतीस
शब्दफुलें मी देताना

अर्थउणे होते गीत
सांग कळले का तुला
शब्दांनी नकळताच
गोंजारल बघ तुला

खेळ मात्र माझा होतो
तुझी साद कानी येता 
रात्र हरवून जाते
तुला शब्दात लिहिता

हल्ली तसा हरवलो
माळरान हिंडताना
बडबडे गीत गात
तुझे रूप पाहतांना

होते घालमेल कधी
तुला शब्दात मांडता
चित्र तुझं येतं तेव्हा
बोलकी होते कविता
_____________________
विठूपुत्र:अविनाश लाड

©Avinash Lad शब्दफुलें

शब्दफुलें #मराठीकविता

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

शब्द...
----------

रिमझिम पावसातला 
प्रत्येक थेंब
तुझ्या आठवणी 
सांगत होता
नागमोडी वळणावरच्या भेटी
पुन्हा पुन्हा सांगत होता
बिलगत होतो 
मी हळुवार
स्वप्नात तुझ्याच
 संवादाला
तेव्हा गाली हासू येता
मन माझं झुरवत गेला
लिहिलेही 
शब्द तुझे
कैक माझ्या कवितेत
तू मात्र वाचत 
राहिलास
मी मात्र भिजत राहिलो
 पावसाच्या थेंबात
पावसाच्या थेंबात😍

------------
अविनाश लाड,राजापूर

©Avinash Lad शब्द..

#WritingForYou
20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

अविनाश लाड

©Avinash Lad स्वप्न

स्वप्न

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

भावरंग 

#MorningGossip

भावरंग #MorningGossip

20678dc985815300282ff4299579fefb

Avinash Lad

स्वर्ग वाटते सुखाचं
==============
छोटं घरकुल माझं
शोभे माझ्या कोकणात 
झाडवेली हिरवळ
खेळ असे अंगणात

गोटा बाजूला गुरांचा
शेणा मुताचा रे वास
बैल राबती शेतात
देण्या सुखाचिया घास

दावणीला उभी गुरे
गोठा शोभे भरलेला
माझा सर्जा अन् राजू
साथ देतात सुखाला

लाखो रुपयात भारी
माझी शोभे बैलगाडी
दुःख जाणून धन्याचे
ओढी खिल्लारी ती जोडी

नागमोडी रस्ता जाई
चहूकडे माळरान
लाल परी मिरवते
रेल्वे कोकणची शान

माझ्या अंगणात रोज
पिंगा घाली चिऊताई
दाणे पेरी तिच्यासाठी
माझी थकलेली आई

दारी तुळस पुजूनी
आई प्रेमळ बोलते 
रोज करून औक्षण
रहा सोबती सांगते

माझ्या कोकणात घर
छोटं कौलारू मातीच
घरोघरी समाधान
स्वर्ग वाटेते सुखाचं
==============
अविनाश लाड,राजापूर-हसोळ

©Avinash Lad आई..

#girl

आई.. #girl

loader
Home
Explore
Events
Notification
Profile