Nojoto: Largest Storytelling Platform
komal5219391931094
  • 39Stories
  • 2Followers
  • 297Love
    0Views

Komal

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

"  कष्ट हा एकच पर्याय आहे प्रसिद्धीसाठी. तेव्हाच ती फुलांच्या सुगंधा सारखी दाही दिशा आसमंतात पसरते. तेव्हा अहंकार न येऊ देता पाय जमिनीवरच रुजवून ठेवणे गरजेचे असते.

©Komal मराठी कोटस...

#DilKiAwaaz

मराठी कोटस... #DilKiAwaaz #मराठीविचार

6 Love

26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

तुझं आहे तुझपाशी
         इतरांची अपेक्षा कां धरावी
         नको खचू जराही....
          कशाला करतेस,उगाच मन हे उदास 
         एकदा पंखात बळ एकवटुनी,घे भरारी गगनी....
          स्त्री जन्माचा होउदे साक्षात्कार 
          स्वतःच सुख शोधत
           दे कर्तुत्वाला तुझ्या झळाळी...
           येईल दिवस तुझाही
          एक ना एक दिवस नक्कीच
           उगाच दुसऱ्याची अपेक्षा बाळगूनी
           नको होऊ मनी उदास....
           तुझ्या सुखाची चावी
           तुझ्याच मुठीत ग बाई
          जरा बघ एकदा डोळे उघडून
            दिसेल सुख तुलाही
           तुझं आहे तुझपाशी
        मग कशाला शोधतेस,
                  "तुझ्यातच दडलेले सुख....!

©Komal #स्त्रीविशेष...

#WalkingInWoods
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

त्याने तिला प्रोपोज करायचं ठरवलं. ना त्याच्याजवळ कोणतंही गिफ्ट, गुलाब, चॉकलेट दिसत होतं ....!
         फक्त हृदयात जोडलेले नाते तिच्याशी. त्या प्रेमाचे बिंब त्याच्या मनात दिसत होते.आयुष्यभर तिला सुखी ठेवण्याची धडपड.हे त्याचे प्रेम ती त्याच्या डोळ्यात अनुभवत होती.

©Komal #प्रेम 

#Love
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

पाहताच त्याला मी
      मनी विचारांचे काहूर माजले.
      त्याच्याच रंगीत स्वप्नानी
    मन वेडे होऊन राहिले.
       समजलेच नाही माझे मला
     कधी हे हृदय तुझ्यात गुंतले.
      आज भासे मला हे मन ,
       माझे न मी राहिले.

©Komal love ❤️

#missingyou
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

स्वतःला आरशात बघताना,
            मला तुझा चेहरा आठवला.
           माझ्या चेहऱ्यावरच हास्य
             तुझ्याच आठवणीने आज खुललं,
            तुझ्यामुळेच आहे आज,
        माझ्या चेहऱ्यावरील सौंदर्याला
         आणि हास्यला महत्व.....!
    तुझ्याशिवाय नाही जगू शकत
     एक क्षण...!
    हे आज मला पुन्हा नव्याने उमगल

©Komal #प्रेम..

#Love
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

नवीन वर्ष 2022
घेऊन आला 
नवी आशा
नवी उमेद
देऊ कर्तुत्वाची जोड
मिळालेल्या संधीचा घेऊन फायदा
देऊ कलाटणी नशिबाला
एकवटून पंखात बळ
दाखवू सामर्थ्य स्वतःचे या जगाला 
रचून इतिहास स्वतःचा
करू वाटचाल नव्याने 
 उज्वल भविष्याकडे 
देऊ झळाळी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला....

©Komal new year 

#HappyNewYear
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

जेव्हा आपण प्रेमात पडतो,
       त्या व्यक्तीला गुणदोषासहित स्वीकारतो.
       वाईट सवयीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो.
      त्याच्या भावनांची कदर करतो.
      दुःखात त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो.
      चुकल्यास माफी ही मागतो,
      त्याच्याशी विचारांची देवाणघेवाण करून मार्ग ही काढतो.
    तो रुसला तर त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो.
    साथ त्याची हवीहवीशी वाटू लागते.
    सुखादुःखात त्याचीच आठवण पहिल्यांदा येते.
    कधी कधी त्याच्या आठवणीने मन उदास होतें.
    त्याचा सहवास संपूच नये असंही वाटते.
    तो जोडीदार बनून आयुष्यभर आपल्याशी प्रामाणिक राहावा.
 हीच आपली अपेक्षा असते.
त्याच्यापासून सुरु झालेलं जगणं शेवटी त्याच्याच मांडीवर संपावे.
हीच भावना असते प्रत्येक प्रेमी युगलांची एकमेकांविषयी ....!!

©Komal #प्रेम 

#missingyou
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

मातृत्व हे स्त्रीला लाभलेली
अनमोल देणगीच आहे.
मुलांना वाढवताना प्रत्येक स्त्रीला
त्याग,संघर्ष करावाच लागतो.
स्त्रीला मातृत्व नसेल तर ती अपूर्णच.
 आई होणे हे स्वर्ग सुखापेक्षा कमी नाही.

©Komal #मातृत्व...

#toyheart
26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

नेहमी लक्षात ठेव्हा विचारच माणसाच आयुष्य घडवतात.त्यामुळे नेहमी चांगले सकारात्मक विचार ठेवा.

©Komal प्रेरणादायी विचार 😊

#MerryChristmas

प्रेरणादायी विचार 😊 #MerryChristmas #मराठीविचार

10 Love

26212b7b0113b3e60cf24baed4777dbd

Komal

" आयुष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर, स्वतःचं कर्तृत्व झळकवा. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेताल, पुन्हा तेच लोक तुम्हाला विचारतील, तू काय केलंस आयुष्यात....?

©Komal माझे विचार 😊

#Flower

माझे विचार 😊 #Flower #मराठीविचार

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile